रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज तिवरे धरण दुर्घटनास्थळास भेट देणार आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.
तिवरे धरण दुर्घटनेत एकूण २२ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी १९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून ३ जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचे शोधकार्य अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर या ठिकाणी राजकीय नेत्यांची रीघ लागलेली पाहायला मिळत आहे.