रत्नागिरी- दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये रत्नागिरीतील आणखी 4 नागरिक सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या 4 जणांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
मरकजला गेलेल्यापैकी 5 जणांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. चौघांचा रिपोर्ट अद्याप मिळालेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सतक डॉ.बोल्हे यांनी दिली.
दिल्लीतील त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तिघेजण गेल्याचे यापूर्वी समोर आले होते. तिघांपैकी एक जण मुंबई, तर एक जण आग्रा येथे क्वारंटाईन आहे. तर एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.