ETV Bharat / state

Nilesh Rane : संजय राऊत शिवसेना संपवून राष्ट्रवादीचे खासदार होतील -निलेश राणे - संजय राऊत यांच्यावर निलेश राणे यांची टीका

संजय राऊत हा व्यक्ती शरद पवारांचा माणूस आहे. पगार सामानाचा आणि इमानी पवार साहेबांची करतात असे म्हणत संजय राऊत लवकरच शिवसेना संपवून राष्ट्रवादीचे खासदार होतील अशी टीका भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. (Nilesh Rane criticizes Sanjay Raut) ते चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

भाजप नेते माजी खासदार निलेश राणे
भाजप नेते माजी खासदार निलेश राणे
author img

By

Published : Mar 14, 2022, 9:10 AM IST

रत्नागिरी - संजय राऊत हा व्यक्ती शरद पवारांचा माणूस आहे. (Nilesh Rane criticizes Sharad Pawar) पगार सामानाचा आणि इमानी पवार साहेबांची करतात असे म्हणत संजय राऊत लवकरच शिवसेना संपवून राष्ट्रवादीचे खासदार होतील अशी टीका भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. ते चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकार परिषद

कोणतीही निवडणुक लढवली नाही

संजय राऊत यांना किती सिरीयस घ्यायचे हे आता पत्रकारांनी ठरवायला हवे. असे म्हणत राऊत या व्यक्तीचे राज्याच्या विकासात काही योगदान नाही, त्या माणसाने कोणतीही निवडणुक लढवली नाही. आणि नगरसेवक पदाला जरी ते उभे राहीले तरी त्यांचे डिपॉजीट जप्त होईल अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

शरद पवार दाऊदचा पहिला माणूस

शरद पवार हे दाऊदचा पहिला माणूस आहे असा मला संशय आहे असा दावा केल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, असल्या गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाहीत असे म्हणत महाराष्ट्रात संशय देखील घेऊ शकत नाही का? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सरकार अडचणीत आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीस हे सर्वांना पुरून उरतील असही राणे म्हणाले आहेत. दरम्यान, असे अनेक ठाकरे आणि पवार खिशात घालून फिरतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा - Leadership Of Sonia Gandhi : काॅग्रेसच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वावरच विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.