ETV Bharat / state

साखरपा जोशीवाडी धरण दुरुस्तीच्या प्रतिक्षेत, अनेक ठिकाणी गळती - sakharpa joshiwada dam maintenance ratngiri news

साखरपा लघु पाटबंधारे योजनेतंर्गत कोंडगाव आणि साखरप्याच्या सीमेवर साखरपा जोशीवाडी नाल्यावर हे धरण बांधण्यात आले. मागील ३ वर्षांपासून या धरणाची देखभाल लांजा जलसंपदा कार्यालयाकडे आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून हे धरण दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. 2009 पासून या धरणाला गळती आहे. परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

साखरपा जोशीवाडी धरण दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

author img

By

Published : Aug 10, 2020, 4:54 PM IST

रत्नागिरी : जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जोशीवाडी येथे असणारे धरण मागील काही वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. 2009 पासून या धरणाला गळती आहे. परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या धरणाची अशीच परिस्थिती राहिली तर तिवरे धरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साखरपा लघु पाटबंधारे योजनेतंर्गत कोंडगाव आणि साखरप्याच्या सीमेवर साखरपा जोशीवाडी नाल्यावर हे धरण बांधण्यात आले. धरणाचे पाणलोट क्षेत्र 2.978 चौ.कि.मी., धरणाची लांबी 346 मीटर, पूर्ण जलसंचय पातळी 132 मीटर, बर पद्धतीचा सांडवा 33 मीटर, डावा कालवा 3 कि.मी., 260 हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी धरणाची उंची 32.50 मीटर, सिंचनासाठी पाणी वापर 3.019 द.ल.घ.मी., पिण्यासाठी पाणीवापर 0.348 द.ल.घ.मी., एकूण पाणीसाठा 3.692 द.ल.घ.मी. असे असून यासाठी त्यावेळी 1279.47 लाख रुपये खर्च केले. सहा वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती. त्यावेळी याची डागडुजी केली होती. मात्र, सध्या या धरणाची गळती सुरुच आहे. या धरणामुळे परिसरातील नागरिकांना याचा उत्तम फायदा झाला परंतु अशा प्रकारच्या दुरवस्थेमुळे धोका निर्माण झाला आहे पाणीसाठा कमी असल्याने

उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू शकते.

मागील ३ वर्षांपासून या धरणाची देखभाल लांजा जलसंपदा कार्यालयाकडे आहे. या कार्यालयाकडून ३ वेळा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला होता. परंतु, त्यामध्ये त्रुटी असल्याने तो मागे आलेला आहे. या कागदपत्रांच्या चढाओढीत शेकडो लोकांचे आयुष्य टांगणीला लागलेले आहे. त्यामुळे शासनाकडून यावर ताबडतोब उपाययोजना होणे गरजेचे आहे. या धरणाला पीचींग, जॅक वेल, वेस्ट वॉटर वॉल या ठिकाणी गळती आहे. त्यामुळे त्यावर उपायोजना तातडीने होणे गरजेचे असून लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.