ETV Bharat / state

'रत्नागिरी शहरातील गॅस, पाणी पाईपलाईनसाठी खणलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा' - monsoon

शहरात गॅस आणि पाईपलाईनसाठी खणण्यात आलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे केली आहे. खणलेले डब्बर आणि माती रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्थ पडलेले असल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सौरभ मलुष्टे यांचं मुख्याधिकारी, प्रभारी नगराध्यक्षांना निवेदन
author img

By

Published : May 30, 2019, 12:28 PM IST

रत्नागिरी - शहरात गॅस आणि पाईपलाईनसाठी खणण्यात आलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी शहरात सध्या गॅस आणि पाणी पाईपलाईनसाठी अनेक ठिकाणी रस्ते खणण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी खणलेल्या रस्त्यांवर नुसती माती ओढली असून व्यवस्थित भराव करण्यात आलेला नाही. खणलेले डब्बर आणि माती रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्थ पडलेले असल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांचं मुख्याधिकारी, प्रभारी नगराध्यक्षांना निवेदन
पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून पावसात या खणण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अशीच राहिली, तर अपघात किंवा खणलेल्या रस्त्यात गाडी अडकणे, असे प्रकार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नगर परिषदेने याची योग्य ती दखल घेऊन रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करावेत, अशी मागणी सौरभ मलुष्टे यांनी प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Intro:गॅस व पाणी पाईपलाईनसाठी खणलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करा

सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांचं मुख्याधिकारी, प्रभारी नगराध्यक्षांना निवेदन

रत्नागिरी, प्रतिनिधी

गॅस व पाणी पाईपलाईनसाठी रत्नागिरी शहरात सध्या रस्ते खणण्यात आले आहेत, सध्या अशा रस्त्यांची अवस्था फार वाईट असून अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे रस्ते सुस्थितीत करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे केली आहे..
रत्नागिरी शहरात सध्या गॅस व पाणी पाईपलाईनसाठी अनेक ठिकाणी सुस्थितीत असलेले रस्ते खणण्यात आले आहेत.. मात्र अनेक ठिकाणी खणलेल्या रस्त्यांवर नुसती माती ओढून ठेवण्यात आली आहे. व्यवस्थित भराव करण्यात आलेला नाही, खणलेला डबर, माती रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्थ पडलेला आहे.. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते. पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.. आणि पावसात जर या खणण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अशीच राहिली, तर अपघात किंवा खणलेल्या रस्त्यात गाडी अडकणे असे प्रकार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नगर परिषदेने याची योग्य ती दखल घेऊन खणण्यात आलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करावेत अशी मागणी सौरभ मलुष्टे यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.. यावेळी स्वप्नील पाथरे, पत्रकार जान्हवी पाटील उपस्थित होते..

Body:गॅस व पाणी पाईपलाईनसाठी खणलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करा

सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांचं मुख्याधिकारी, प्रभारी नगराध्यक्षांना निवेदन Conclusion:गॅस व पाणी पाईपलाईनसाठी खणलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करा

सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांचं मुख्याधिकारी, प्रभारी नगराध्यक्षांना निवेदन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.