ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत विशेष' रस्त्याच्या निर्मितीसाठी काजीर्डा ग्रामस्थांचा पुढाकार

राजापूर तालुक्यातील काजीर्डा गाव सध्या चर्चेत आलं आहे, ते म्हणजे येथील लोक गावाच्या विकासासाठी एकवटले असून, श्रमदानातून रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे. ग्रामस्थांना त्यांच्या या कार्यासाठी मनसे देखील मदत करत आहे.

रस्त्याच्या निर्मितीसाठी काजीर्डा ग्रामस्थांचा पुढाकार

author img

By

Published : Mar 10, 2021, 6:46 PM IST

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील काजीर्डा गाव सध्या चर्चेत आलं आहे, ते एका वेगळ्याच गोष्टीमुळे, हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे. हे गाव निसर्गसंपन्न असून, गावात पर्यटनास मोठा वाव आहे. कार्जीडा घाट हा गाव आणि पश्चिम महाराष्ट्र यामधील दुवा आहे. या घाटातून रस्ता झाल्यास पश्चिम महाराष्ट्र दक्षिण रत्नागिरीच्या आणखी जवळ येईल. या रस्त्यामुळे जवळपास 40 ते 45 किलोमिटरचे अंतर वाचेल. ही गोष्ट लक्षात घेऊन, कार्जीडा गावातील ग्रामस्थ सरसावले आहेत. श्रमदानातून रस्ता तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना यासाठी मनसेची साथ मिळत आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं राजापूर तालुक्यातील कार्जीडा गाव, या काजीर्डा घाटातून रस्ता झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी तो गगनबावडा, भुईबावडा आणि अणुस्कुरा घाटाला पर्याय ठरू शकतो. या गावातील लोकं यापूर्वी अगदी चालत कोल्हापूरच्या बाजारपेठेत जायची. त्यासाठी त्यांना केवळ 3 ते 4 तासांचा वेळ लागायचा. मात्र जर हा रस्ता झाल्यास या गावातून अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात वाहनाने कोल्हापूरला जाणे शक्य होणार आहे. दक्षिण रत्नागिरी ते कोल्हापूर हे अंतर जवळपास एक ते दिड तासांनी आणखी कमी होऊ शकतं. 1977-78 साली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र काम अर्ध्यावरच रखडले.

रस्त्याच्या निर्मितीसाठी काजीर्डा ग्रामस्थांचा पुढाकार

धरणामुळे रखडला विकास

जामदा धरणामुळे हे गाव धरणप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर झालं होतं, त्यामुळे गावातील विकास पुर्णतः ठप्प झाला होता. या गावातील लोकांचा या धरणाला आजही विरोध आहे. 16 वर्ष उलटून गेली, धरणाच्या कामाला करोडो रुपये खर्च झाले, मात्र धरण काही झालं नाही. फडणवीस सरकारने या धरणाच्या कामाची चौकशीही लावली होती. सरकारच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

विकासासाठी ग्रामस्थ एकवटले

आता गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रस्ता तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी आता लोकसहभागाचे हत्यार उपसलं आहे. प्रत्येक कुटुंबातील एक माणूस हा रस्ता तयार करण्यासाठी योगदान देत आहे. ग्रामस्थांनी रस्त्याची आखणी करून, कामाला सरुवात केली आहे. नवीन तयार करण्यात येणारा हा 20 ते 25 किलोमीटरचा रस्ता जवळपास 60 गावांना जोडणार असून, यामुळे दळवळणाची प्रक्रिया अधिक गतिमान व सोपी होणार आहे. ग्रामस्थांनी बैठक घेऊन कामाला सुरुवात केली असून, मनसेच्या वतीने ग्रामस्थांना रस्त्याच्या निर्मितीसाठी जेसीबीची मदत करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.