ETV Bharat / state

RathnagiriRains : मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ; दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन - Rising water level in rivers due to rains in Ratnagiri

जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीतील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून काही ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत.

रत्नागिरीत मुसळधार पाऊस
rathnagiri rains news
author img

By

Published : Jul 15, 2021, 5:11 PM IST

Updated : Jul 15, 2021, 7:33 PM IST

रत्नागिरी - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून काही ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासंबंधित यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत.

व्हिडीओ

24 तासांत सरासरी 89.07 मिमी पावसाची नोंद -

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 89.07 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण 801.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात 102.10 मिमी, दापोली 89.20 मिमी, खेड 70.70, गुहागर 94.80 मिमी, चिपळूण 70.40 मिमी, संगमेश्वर 67.60 मिमी, रत्नागिरी 86.50 मिमी, राजापूर 99.60 मिमी, लांजा 120.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आवाहन -

सद्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान होत असून जिल्ह्यातील अनेक नदी, नाले व ओढ्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून अनेक ठिकाणी पुल व रस्त्यांवरून पुराचे पाणी वाहत आहे. या ठिकाणी नागरिकांनी दक्षता घ्यावी, पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये, पुराच्या वेळी नदी, धरणाचे सांडवे, नाल्यांमध्ये पोहण्यासाठी जाऊ नये, विजेच्या तारां व विजेच्या खांबापासून लांब राहावे, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा - उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल, या वेबसाईटवर बघता येईल तुमचा निकाल

Last Updated : Jul 15, 2021, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.