ETV Bharat / state

बेपत्ता नावेद - २ या मच्छीमारी नौकेचे अवशेष अखेर सापडले - नावेद २ नाव अवशेष सापडले

गेले 40 दिवस बेपत्ता असलेल्या जयगड येथील नावेद - २ या मच्छीमारी नौकेचे अवशेष अखेर शनिवारी सापडले. मासेमारी करताना तेथील एका मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अवशेष आले. त्यामुळे ही नौका बुडाल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये जाळे, अँकर, दोरीचा समावेश आहे.

remains of missing Naved 2 fishing boat found
नावेद २ नाव अवशेष रत्नागिरी
author img

By

Published : Dec 5, 2021, 3:01 AM IST

रत्नागिरी - गेले 40 दिवस बेपत्ता असलेल्या जयगड येथील नावेद - २ या मच्छीमारी नौकेचे अवशेष अखेर शनिवारी सापडले. मासेमारी करताना तेथील एका मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अवशेष आले. त्यामुळे ही नौका बुडाल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये जाळे, अँकर, दोरीचा समावेश आहे.

माहिती देताना स्थानिक मच्छीमार

हेही वाचा - Cyclone Jawad Alert : राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; जोवाड चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी !

जयगड भागातच हे अवशेष मिळाले आहेत. या वस्तू नौका मालकाने ओळखून त्या आपल्याच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिंदल कंपनीच्या जहाजाने ठोकर दिल्याने नौकेचा अपघात झाल्याचा दावा नौका मालक नासीर संसारे यांनी केला आहे.

26 ऑक्टोबरपासून बोट बेपत्ता

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला मच्छीमारीसाठी गेलेली नासीर हुसेनमियाँ संसारे यांच्या मालकीची 'नावेद 2' ही मच्छीमारी बोट सहा खलाशांसह बेपत्ता झाली होती. या बोटीवरील अनिल आंबेरकर ( वय ५०, रा. साखरीआगर - गुहागर) या एका खलाशाचा मृतदेह सापडला होता. बाकी सर्वजण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर बोटीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तटरक्षक दलालाही याची माहिती देण्यात आली. पाणबुड्या किंवा सोनार यंत्रणेद्वारे बेपत्ता नौकेचा शोध घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्याप प्रशासनाला काहीच हाती लागलेले नाही. सुरक्षा यंत्रणाला एखादी नौका बेपत्ता होते आणि काहीच माहिती मिळत नाही, यावरून मच्छीमारांंमध्ये अस्वस्थता आहे.

बोटीचा अँकर, दोरी आणि जाळे सापडले

दरम्यान नजीर जांभारकर हे शनिवारी जयगड येथे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यामध्ये बोटीचा अँकर, दोरी आणि जाळे सापडले. त्याची माहिती नावेद - २ नौकेचे मालक संसारे यांना देण्यात आली. संसारे यांनी ते अवशेष पाहिल्यानंतर आपल्याच बोटीवरील असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, या बोटीचा अपघात होऊन तिला जलसमाधी मिळाल्याचे पुढे आले आहे. या भागात नौका आहे, परंतु ती ओढता येणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा आता पुढे काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बोटीला जिंदल कंपनीच्या जहाजाची ठोकर बसल्यानेच अपघात होऊन ही दुर्घटना घडली असावी, याची पूर्ण खात्री आहे. या अपघातात आमची माणसे गेली याचे मोठे दुःख आहे. आमच्या बोटीचे ५० ते ६० लाखांचे नुकसान झाले आहे. परंतु, कधीही भरून न निघणारे माणसांचे नुकसान आहे. आता आम्ही प्रशासन, पोलीस यंत्रणा काय करते, यावर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया नावेद - २ नौकेचे मालक नासीर संसारे, तसेच मच्छीमारांनी दिली.

हेही वाचा - VIDEO : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजल्या; विद्यार्थ्यांचे स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.