ETV Bharat / state

'त्या' प्रकाराबाबत तक्रार दाखल करणार - प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक - रत्नागिरी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह नेला बातमी

जिल्हा शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. पण, त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत त्या रुग्णाचा मृतदेह घेऊन गेले. त्यानंतर अंत्यसंस्कार केले. याबाबात तक्रार करण्याबाबात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून अशा घटना पुढे होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालय
जिल्हा शासकीय रुग्णालय
author img

By

Published : Jul 28, 2020, 5:07 PM IST

रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जबरदस्तीने मृतदेह अतिदक्षता विभागातून उचलून नेत या रुग्णावर अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे. या रुग्णाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, याबाबत तक्रार करणार असून, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलीस फाटाही मागविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी दिली आहे.

माहिती देताना प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले

रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील एका कोरोना संशयित रुग्णावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजेच कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना अतिदक्षता विभागात या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती नातेवाईकांना समताच त्यांनी गैरसमजातून अतिदक्षाता विभागात जावून या रूग्णाचा मृतदेह ताब्यात घेतला. रविवारी (दि. 26 जुलै) रात्री हा सर्व प्रकार घडला. यावेळी परिचारिका आणि वैद्यकीय अधिकार्यांनी याला विरोध केला. मात्र, या 25 ते 30 जणांच्या समूहाने या विरोधाला न जुमानत उलट या कर्मचाऱ्यांशीच हुज्जत घातली. आणि मृतदेह घेऊन गेले. पॉझिटिव्ह मृत रुग्णासाठी शासनाने ठरवून दिलेली प्रक्रिया पूर्ण न करताच नातेवाईक मृतदेह तसाच घेवून गेले. त्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. दरम्यान, या रुग्णाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान,आम्ही नातेवाईकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, ते ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट ते कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आले. रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकाराबाबत तक्रार करणार असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणे सुरू आहे. तसेच असा प्रकार पुन्हा घडू, नये यासाठी अतिरिक्त पोलीस फौज मागविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली आहे.

हेही वाचा - गणेशोत्सवासाठी गावात या.. पण 14 दिवस क्वारंटाईन व्हा; रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे नागरिकांना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.