रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे सकारात्मक आहेत. तो रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा यासाठी सामंजस्याने तोडगा काढू व यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री नारायण राणे यांनी दिल्याची माहिती रिफायनरी समर्थकांनी दिली आहे. मंगळवारी नारायण राणे यांची दिल्लीतील उद्योग भवनात रिफायनरी समर्थकांनी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून भेट घेतली.
मंत्री नारायण राणे यांची भेट कागदोपत्री सादरीकरणयावेळी जवळपास तासभर चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान स्थानिकांना रोजगार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विकास, शैक्षणिक व आरोग्य सुविधा यासाठी हा प्रकल्प राजापुरातच व्हावा यासाठी कागदोपत्री विस्तृत सादरीकरण ना . राणे यांना करण्यात आले. या चर्चेअंती केंद्रीय मंत्री नारायण राणे रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याची माहिती रिफायनरी समर्थकांनी दिली आहे. या शिष्टमंडळामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, सचिव अविनाश महाजन, सल्लागार सीए. नीलेश पाटणकर तसेच मिलिंद दांडेक यांचा सहभाग होता.हेही वाचा - उपराजधानीत कोरोनानंतर डेंग्यूचे थैमान; पंधरा दिवसात १०६४ डेंग्यूचे रुग्ण