ETV Bharat / state

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि एएनएम नर्सला रत्नागिरी जिल्हा परिषद देणार प्रोत्साहनपर भत्ता - प्रोत्साहनपर भत्ता

कोरोनाविरोधात आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महसूल विभागासोबतच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि एएनएम नर्स या देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि एएनएम नर्स यांना सलग ३ महिने ५०० रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा परिषदेने घेतला आहे.

Ratnagiri Zilla Parishad
रत्नागिरी जिल्हा परिषद
author img

By

Published : Apr 22, 2020, 1:12 PM IST

रत्नागिरी - सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महसूल विभागासोबतच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि एएनएम नर्स या देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि एएनएम नर्स(गाव पातळीवर कार्य करणाऱ्या नर्स) यांना सलग ३ महिने ५०० रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा परिषदेने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि एएनएम नर्सला रत्नागिरी जिल्हा परिषद देणार प्रोत्साहनपर भत्ता

कोरोनाच्या या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि महसूल विभाग यांना शासनाने विमा कवच दिले होते. मात्र, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि एएनएम नर्स तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाचा विचार करुन त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सामंत यांनी दिली.

जिल्ह्यात २ हजार ६८० अंगणवाडी सेविका, १ हजार २८५ आशा वर्कर्स आणि ३७८ एएनएम नर्स काम करत आहेत. त्यांना सलग ३ महिने ५०० रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. यासाठी दर महिन्याला १३ लाख ६२ हजार रुपये अतिरिक्त खर्च जिल्हा परिषद उचलणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

सामंतांनी घेतलेल्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, आरोग्य सभापती बाबू म्हाप आदी उपस्थित होते. सलग ३ महिने प्रोत्साहनपर भत्ता देणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद असल्याचे सामंत यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.