ETV Bharat / state

विनाकाराण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, कारवाईसाठी स्वतः 'एसपी' उतरले रस्त्यावर

author img

By

Published : Mar 28, 2020, 12:20 PM IST

घरात बसा, बाहेर पडू नका, असे सांगण्यात येत असतानाही रत्नागिरीकरांची रस्त्यावर गर्दी आणि वर्दळ वाढली होती. त्याला आळा घालण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरले. मारूती मंंदिर भागातील पोलीस चेकपोस्टवर उभे राहून ते वाहनांची तपाणी करत होते.

ratnagiri sp pravin mundhe  corona update  ratnagiri corona  रत्नागिरी पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे
क्षुल्लक कारणांसाठी लोकांची गर्दी, कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः उतरले रस्त्यावर

रत्नागिरी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लाॅकडाऊन आहे. मात्र, या संचारबंदीच्या काळातही विनाकारण अनेकजण गाड्या घेऊन रस्त्यावर फिरत असतात. वारंवार सूचना देऊनही अनेकजण क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कारवाईसाठी अखेर आज रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे हेच स्वतः रस्त्यावर उतरले.

घरात बसा, बाहेर पडू नका, असे सांगण्यात येत असताना रत्नागिरीकरांची रस्त्यांवर गर्दी आणि वर्दळ वाढली होती. त्याला आळा घालण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षकच रस्त्यावर उतरले. मारूती मंंदिर भागातील पोलीस चेकपोस्टवर उभे राहून ते वाहनांची तपाणी करत होते. या अगोदर रत्नागिरी पोलिसांनी जमाबंदीच्या आदेशात कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, त्यानंतर थोडी शिथिलता दिली गेली. त्याचा गैरफायदा घेतला जातो, असे समजल्यावर आता रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. संचारबंदीत फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.