ETV Bharat / state

Ratnagiri Jawan Ajay Dhagale : चीन सीमेवर झालेल्या भूस्खलनात रत्नागिरीचा जवान शहीद - रत्नागिरीचा जवान शहीद

चीन सीमेवर झालेल्या भूस्खलनात लष्करातील महाराष्ट्राचे सुभेदार अजय ढगळे शहीद झाले आहेत. उद्या त्यांच्या पार्थिवावर रत्नागिरीतील त्यांच्या मूळ गावी अत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Ajay Dhagale
अजय ढगळे
author img

By

Published : Apr 2, 2023, 10:43 AM IST

तेजपूर (आसाम)/रत्नागिरी : अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरच्या फॉरवर्ड भागात बर्फवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात अडकून भारतीय लष्कराचे एक जवान शहीद झाले. सुभेदार अजय शांताराम ढगळे (३६) असे शहीद जवानाचे नाव असून, ते मूळचे रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील मोरवणे ढवळेवाडी येथील आहेत. चीन सिमेलगत रस्त्याची रेकी करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी दरड कोसळून त्यांचा मृत्यू झाला. शहीद ढगळे यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या मूळ गावी आणले जाण्याची शक्यता असून उद्या त्यांच्यावर मोरवणे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सुभेदार अजय ढगळे
सुभेदार अजय ढगळे

27 मार्च रोजी भूस्खलनात सापडले : चीन सीमेलगतच्या तवांग भागात दरवर्षी या हंगामात बर्फ वितळतो. यावेळी येथे रस्ता तयार करण्यासाठी रेकी केली जाते. या कामासाठी सुभेदार अजय ढगळे अन्य जवानांसह गेले होते. 24 मार्च पासून या भागात सतत पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भूस्खलनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. 27 मार्च रोजी सकाळी रेकी करण्यास गेलेले जवान या भूस्खलनात सापडले. त्या दिवसापासून हे जवान बेपत्ता होते.

मोरवणे गावावर शोककळा : भारतीय सैन्य गेल्या सहा दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे शोधकार्यात अनेक अडथळे येत होते. अखेर शनिवारी सकाळी 10:50 वाजता लष्कराच्या अनेक पथकांनी आणि तज्ञ उपकरणांनी शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह मातीखाली सापडला. या दुर्घटनेत लष्कराचे अन्य 5 जवान जखमी झाले आहेत. संरक्षण प्रवक्ते रावत यांनी झालेल्या दुर्घटनेची माहिती दिली. हे वृत्त मोरवणे गावात पोहताच गावावर शोककळा पसरली आहे. शहीद अजय ढगळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, चार बहिणी व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव गावी नेण्यापूर्वी तवांगमध्ये पुष्पहार अर्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : BJP leader Raju Jha Shot Dead : कोळसा माफिया, भाजप नेते राजू झा यांची बंगालमध्ये गोळ्या झाडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.