ETV Bharat / state

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं थाटात आगमन; भाद्रपद प्रतिपदेला प्रतिष्ठापणा

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील चौसोपी वाड्यातील पंत जोशी यांच्या गणपतीला पहिला मान मिळतो. 376 वर्षांची परंपरा असणाऱ्या या सार्वजनिक गणपतीचा प्रतिपदा ते चतुर्थी असा चार दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं थाटात आगमन झाले.
author img

By

Published : Aug 31, 2019, 2:20 PM IST

रत्नागिरी - पहिल्या मानाच्या गणपतीच्या आगमनाने कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील चौसोपी वाड्यातील पंत जोशी यांच्या गणपतीला पहिला मान मिळतो. जोशी यांना मोरगाव येथे दृष्टांत मिळाल्यापासून या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा सुरू झाली.

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं थाटात आगमन झाले.

376 वर्षांची परंपरा असणाऱ्या या सार्वजनिक गणपतीचा प्रतिपदा ते चतुर्थी असा चार दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.

हेही वाचा 'लाईट कॅमेरा अॅक्शन'नंतर 'गणपती बाप्पा मोरया'चा आवाजही 'या' स्टुडिओतून होणार लुप्त

पेशवेकाळापासून गणपतीचे आगमन याचप्रकारे होते. दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी, गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. चौघडे, तुतारी, ढोल ताशे या पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघणाऱ्या या गणपतीचा थाट काही वेगळाच असतो. वाजत-गाजत मूर्ती आणल्यानंतर गणपतीची विधीवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठापणा केली जाते.

हेही वाचा गणपती बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न; पालघर परिसरात रस्त्यांची दुरवस्था

मोरगावच्या उत्सवाप्रमाणे या ठिकाणी गणेशोत्सवाचा हा उत्साह साजरा केला जातो. पावणे चारशे वर्षाहून अधिक काळाची पंरपरा लाभलेला देवरुखच्या चौसोपी वाड्यातील हा गणेशोत्सव कोकणातील परंपरा आणि संस्कृती आजही जपतोय. या गणेशोत्सवाचा आगमनानंतरच कोकणातल्या गणेशोत्सवाला सुरुवात होते.

Intro:कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं थाटात आगमन

देवरुखमधल्या चौसोपी वाड्यात भाद्रपद प्रतिपदेला होते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरवात आज भाद्रपद प्रतिपदेपासून झाली आहे.. कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आज आगमन झालं. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख मधल्या चौसोपी वाड्यातील पंत जोशी यांचा हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ओळख आहे. 376 वर्षांची परंपरा असणारा देवरुख मधला हा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जातो. देवरुखमधल्या जोशी यांना मोरगाव इथं दृष्टांत मिळाल्यापासून या गणपतीची स्थापना करण्यात येते. मोरगावच्या प्रथेपरंपरेनुसार या हा उत्सव साजरा करण्यात येतो. प्रतिपदा ते चथुर्थी असा चार दिवस हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो..

आज पावसानं हजेरी लावली असताना सुद्धा या गणपतीचं मोठ्या थाटात आमगन झालं. वाजत-गाजत निघणाऱ्या या मिरवणुकीला अनेक चाकरमानी हजेरी लावतात. पेशवेकाळापासून या गणपतीची हि अशीच आगमन मिरवणुक काढली जातेय. दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आणि दरवर्षी एकच आकार, उंची असणारी हि गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. या मिरवणुकीत चाकरमानी हौसेने सहभागी होतात. अत्यंत देखण्या अशा या गणपतीची मिरवणूक देवरुख शहरातून निघते. चौघ़डे तुतारी, ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणाऱ्या या गणपतीचा थाट काही वेगळाच असतो. गणरायाच्या या आगमन मिरवणुकीत मूर्तीची अनेक ठिकाणी मानानं पुजा केली जाते. या गणरायाच्या स्वागताचा उत्साह कुठे कमी होत नाही. वाजत-गाजत मूर्ती आणल्यानंतर या गणपतीची विधिवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठापणा केली जाते..
मोरगावच्या उत्सवाप्रमाणे या ठिकाणी गणेशोत्सवाचा हा उत्साह साजरा केला जातो. पावणे चारशे वर्षाहून अधिक काळाची पंरपरा लाभलेला देवरुखच्या चौसोपी वाड्यातील हा गणेशोत्सव कोकणातील परंपरा आणि संस्कृती आजही जपतोय. या गणेशोत्सवाचा आगमनानंतर कोकणातल्या गणेशोत्सवाला सुरवात होते..

Byte --- मनोज जोशी, मानकरी
माहेरवाशीणBody:कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं थाटात आगमन

देवरुखमधल्या चौसोपी वाड्यात भाद्रपद प्रतिपदेला होते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणाConclusion:कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं थाटात आगमन

देवरुखमधल्या चौसोपी वाड्यात भाद्रपद प्रतिपदेला होते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.