रत्नागिरी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांनी आज (रविवारी) शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे माझे मताधिक्य नक्कीच वाढेल, असा विश्वास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
- वैभव वीरकरही स्वगृही-
शिंदे यांच्यासह स्वाभिमानचे युवक जिल्हाध्यक्ष वैभव वीरकर हे स्वगृही परतले असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशावेळी राऊत म्हणाले, शिवसेनेने केलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. तर आमदार सदानंद चव्हाण यांनी सूचक विधान करत ही आपल्या कामाची पोचपावती असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष मेघना शिंदे, गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवी, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, स्वाभिमान कातकरी समाज जिल्हाध्यक्ष विलास निकम, गुहागर महिला तालुकाध्यक्ष दीप्ती चव्हाण, गुहागर तालुका उपाध्यक्ष विलास जाधव, चिपळूण तालुका उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्ये, खुडदे सरपंच प्रकाश निवाथे, स्वाभिमान जिल्हा सरचिटणीस राजेंद्र साळवी, नांदिवसे विभागप्रमुख बाबा शिंदे, आदिवासी समाजाचे चिपळूण तालुकाध्यक्ष शशिकांत निकम, चिपळूण तालुका सचिव संजय जगताप, वेळणेश्वर विभाग प्रमुख दीपक चव्हाण, स्वाभिमान युवक जिल्हा उपाध्यक्ष कपिल काताळकर, स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष मनोज पवार, स्वाभिमान आदिवासी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष नीता निकम, शशिकांत शिंदे आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.