ETV Bharat / state

आता विना परवाना वाहनचालकांऐवजी पालकांवर होणार कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - rules

रस्ते सुरक्षा समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी
author img

By

Published : May 8, 2019, 2:35 PM IST

रत्नागिरी - वाहतूक नियमांची पायमल्ली करून विना परवाना वाहन चालविणाऱ्या युवक-युवतींऐवजी त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत दिले. वाहन चालविण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असताना १५ ते १८ वर्षांच्या आतील युवक-युवती मोठ्या प्रमाणावर वाहने चालवतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्ते सुरक्षा समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या सभेला रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, समिती सदस्य पोलीस निरीक्षक डी. के. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, एस. टी. चे विभाग नियंत्रक दिवटे, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक, बांधकाम विभागाचे दौलत मयेकर, शहर अभियंता गौतम भगत व नगर पालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक आदींची उपस्थिती होती.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी
शहरातील वाहतूकीस शिस्त लागावी यासाठी चौकांमध्ये रम्बलर्स आणि झेब्रा क्रॉसिंग लावण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. रस्त्यांवरून वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना त्यांचा वाहन परवाना निलंबित करणे तसेच भविष्यकाळात दंडासोबतच परवान्यासाठी कायमस्वरुपी अपात्र ठरविणे आदी कारवाई आवश्यक झाली आहे. यानुसार वाहतूक शाखेने कामकाज करावे, असे ते म्हणाले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर यापूर्वी २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येत होती. आता नव्या बदलानुसार हा दंड ५०० रुपये भरावा लागेल, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. शहरातील रस्त्यात अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग करणाऱ्या वाहनांवर जॅमर्स लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सभेत दिल्या.येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर योग्य ते साईनबोर्ड लावून अपघात टाळण्याची जबाबदारी रस्त्याच्या कंत्राटदारांवर आहे. यात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर थेट कारवाई करा व गुन्हे नोंदवा, असेही आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिले.

Intro:नियमबाह्य अज्ञान वाहनचालकांसाठी
आता पालकांवर कारवाई होणार!

रस्ता सुरक्षा समिती सभेत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रत्नागिरी, प्रतिनिधी

वाहतूक नियमांची पायमल्ली करुन परवाना नसलेल्या वयात वाहन चालविणाऱ्या युवक-युवतींबाबत त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत दिले.
वाहन परवाना मिळविण्याचे वय 18 वर्षे असताना 15 ते 18 वर्षे वयोगटातील युवक-युवती मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर चालवतात. यातून त्यांच्यासह इतर नागरिकांनाही अपघाताचा धोका संभवतो. याबाबत नुकत्याच जारी नियमात अशा वाहनधारकांच्या पालकांवर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्या दृष्टीकोनातून रत्नागिरीत कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिल्या.
         रस्ते सुरक्षा समितीची त्रैमासिक सभा आज जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या सभेला रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, समिती सदस्य पोलीस निरीक्षक डी.के. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, एस.टी.चे विभाग नियंत्रक दिवटे, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक, बांधकाम विभागाचे दौलत मयेकर, शहर अभियंता गौतम भगत व नगर पालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक आदींची उपस्थिती होती.
         शहरातील वाहतूकीस शिस्त लागावी यासाठी चौकांमध्ये रम्बलर्स आणि झेब्रा क्रॉसिंग लावण्यात याव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सभेत दिल्या.
         रस्त्यांवरुन वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना त्यांचा वाहन परवाना निलंबित करणे तसेच भविष्यकाळात दंडासोबतच परवान्यासाठी कायमस्वरुपी अपात्र ठरविणे आदी कारवाई आवश्यक झाली आहे. यानुसार वाहतूक शाखेने कामकाज करावे, असे ते म्हणाले.
         वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर यापूर्वी 200 रुपये दंडाची कारवाई करण्यात येत होती आता नव्या बदलानुसार हा दंड 500 रुपये भरावा लागेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
         शहरातील रस्त्यात अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग करणाऱ्या वाहनांवर जॅमर्स लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सभेत दिल्या.
         येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर योग्य ते साईनबोर्ड लावून अपघात टाळण्याची जबाबदारी रस्त्याच्या कंत्राटदारांवर आहे. यात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर थेट कारवाई करा व गुन्हे नोंदवा असेही आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिले.

Body:नियमबाह्य अज्ञान वाहनचालकांसाठी
आता पालकांवर कारवाई होणार!

रस्ता सुरक्षा समिती सभेत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Conclusion:नियमबाह्य अज्ञान वाहनचालकांसाठी
आता पालकांवर कारवाई होणार!

रस्ता सुरक्षा समिती सभेत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.