रत्नागिरी - नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. शहरातील 15 प्रभागांमध्ये एकूण 30 वॉर्ड आहेत. यातील 49 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सकाळपासूनच मतदानाबाबत मतदारांमध्ये उत्साह दिसत नव्हता. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत फक्त 47.38 टक्के मतदान झाले.
पहिल्या 2 तासात अवघे 7.11 टक्के मतदान झाले. दुपारनंतर त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होत गेली. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 35.34 टक्केच मतदान झाले. सकाळच्या सत्रात चारही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 47.38 टक्के मतदान झाले. त्यामध्ये 14 हजार 400 पुरुष मतदार तर 13 हजार 444 महिलांसह एकूण 27 हजार 844 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोला अपघात; 3 ठार 1 गंभीर जखमी
दरम्यान, सोमवारी सकाळी 10 वाजेपासून नगर परिषद सभागृहात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. कमी झालेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार ते उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.