ETV Bharat / state

पावसाचा जोर ओसरला, प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरु - जगबुडी नदी

अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड, दापोली, राजापूरमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात चिपळूण आणि खेड शहरांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. वाशिष्ठी नदीला पूर आल्याने शुक्रवारी रात्रीपासून पाणी चिपळूण बाजार पेठेसह खेर्डी परिसरात घुसले. मोठ्या पुराची चाहूल लागल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवला होता. खेड शहरातही जगबुडी नदीला पूर आल्याने अशीच स्थिती होती.

पावसाचा जोर ओसरला, प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरु
author img

By

Published : Jul 28, 2019, 5:39 PM IST

रत्नागिरी - मुसळधार पावसाने गेले चार दिवस अक्षरशः झोडपून काढले होते. पावसामुळे चिपळूण आणि खेड बाजारपेठ पुराच्या वेढ्यात अडकली होती. मात्र, आता पावसाचा जोर ओसरल्याने पुराच्या पाण्याचा निचरा झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने शनिवारपासूनच हाती घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही आज पूरग्रस्त चिपळूण परिसर आणि दरड कोसळलेल्या परशुराम घाटाची पाहणी केली. दरम्यान गेल्या २४ तासांत ३२.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड आणि खेडमध्ये ५० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली आहे.

पावसाचा जोर ओसरला, प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरु

अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड, दापोली, राजापूरमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात चिपळूण आणि खेड शहरांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. वाशिष्ठी नदीला पूर आल्याने शुक्रवारी रात्रीपासून पाणी चिपळूण बाजार पेठेसह खेर्डी परिसरात घुसले. मोठ्या पुराची चाहूल लागल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवला होता. खेड शहरातही जगबुडी नदीला पूर आल्याने अशीच स्थिती होती. शनिवारी दिवसभर बाजारपेठा पाण्याखाली होत्या. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने संध्याकाळी पाणी ओसरू लागले. आजही पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र, पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. रविवारी दुपारपर्यंत चिपळूणमध्ये २४० पंचनामे करण्यात आले, तर खेर्डीमध्ये १३० पंचनामे झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी -

चिपळूण मध्ये भरलेल्या पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी चिपळूण शहराची पाहणी केली. शहरातील चिंचनाका, बाजारपेठ वाशिष्ठी नदी पात्र, शिव नदी आदी भागांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी कल्पना जगताप, तहसीलदार जीवन देसाई, चिपळूण नगरपालिकेचे अधिकारी श्री ठसाळे उपस्थित होते. परशुराम घाटात शनिवारी दरड कोसळून महामार्ग १६ तास ठप्प झाला होता. या ठिकाणचीही जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

Intro:पावसाचा जोर ओसरला, पुराचं पाणीही ओसरलं

प्रशासनाकडून पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर

जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुसळधार पावसाने गेले चार दिवस अक्षरशः झोडपून काढलं होतं. या पावसामुळे चिपळूण आणि खेड बाजारपेठ पुराच्या वेढ्यात अडकली होती.. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्याने, पुराच्या पाण्याचा निचराही झाला आहे. त्यामुळे शनिवारपासूनच प्रशासनाकडून पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही आज पूरग्रस्त चिपळूण परिसर तसेच दरड कोसळलेल्या परशुराम घाटाची पाहणी केली.. दरम्यान गेल्या 24 तासांत 32.78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड आणि खेडमध्ये 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे.
अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड, दापोली, राजापूरमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यात चिपळूण आणि खेड शहरांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. वाशिष्ठी नदीला पूर आल्याने शुक्रवारी रात्रीपासून पाणी चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात घुसले. मोठ्या पुराची चाहूल लागल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता. खेड शहरातही जगबुडी नदीला पूर आल्याने अशीच स्थिती होती. शनिवारी दिवसभर बाजारपेठा पाण्याखाली होत्या. पण पावसाचा जोर कमी झाल्याने संध्याकाळी पाणी ओसरू लागलं. आजही पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र होतं. पण पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. रविवारी दुपारपर्यंत चिपळूणमध्ये 240 पंचनामे करण्यात आले होते, तर खेर्डीमध्ये 130 पंचनामे झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

चिपळूण मध्ये भरलेल्या पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी चिपळूण शहराची पाहणी केली. शहरातील चिंचनाका, बाजारपेठ वाशिष्ठी नदी पात्र, शिव नदी आदी भागांची त्यांनी पाहणी केली.. यावेळी प्रांताधिकारी सौ कल्पना जगताप, तहसीलदार जीवन देसाई, चीपळूण नगरपालिकेचे अधिकारी श्री ठसाळे उपस्थित होते.
परशुराम घाटात शनिवारी दरड कोसळून महामार्ग 16 तास ठप्प झाला होता. या ठिकाणचीही जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी केली.. आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत..

Body:पावसाचा जोर ओसरला, पुराचं पाणीही ओसरलं

प्रशासनाकडून पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर

जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त भागाची पाहणीConclusion:पावसाचा जोर ओसरला, पुराचं पाणीही ओसरलं

प्रशासनाकडून पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर

जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.