रत्नागिरी - जिल्ह्यासहित चिपळूणमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे .दिवाळी खरेदीच्या ऐन हंगामात पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. घराबाहेर पडताच सतत येणाऱ्या पावसाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
याच कारणामुळे चिपळूण बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे .ऐन दिवाळीत बाजारपेठेतील गर्दी ओसरली असल्याने येथील व्यापारी तसेच दिवाळीनिमित्त फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी आणि सणाचे अन्य साहित्य विकणारे विक्रेतेही चिंतेत आहेत.