रत्नागिरी - गणेशोत्सव आटपून चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. पण रेल्वे तसेच बसला असलेल्या गर्दीमुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे. अपघातही घडत आहेत. अशाच एका बाक्या प्रसंगातून एका प्रवाशाचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचवले आहेत.
हेही वाचा - राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडालेल्या तिघांपैकी 'दोघे' अद्यापही बेपत्ता
खेड रेल्वे स्थानकावरचा गुरूवार १२ सप्टेंबरचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर खेड रेल्वे स्थानकावर येत होती. या गाडीला प्रचंड गर्दी होती. अशात रेल्वेत चढणारे प्रवासी रेल्वेत चढताना कुठलीच शिस्त नसल्याचे दिसून आले. याचा सामना वृद्धांना करावा लागला. ६५ वर्षीय देवजी गोखले गाडीत चढत होते. गाडीत चढताना एवढी गर्दी झाली की दरवाज्यातून चढताना देवजी प्लॅटफार्म आणि रेल्वेगाडीच्या मध्ये पडले. तरी प्रवासी त्यांच्या अंगावरून रेल्वे गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होते.
हेही वाचा - वेध विधानसभा निवडणुकांचे; दापोली विधानसभा मतदारसंघ : कुणाचे 'कदम' पडणार पुढे ?
ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांना काय घडले याची कल्पना आली आणि त्यांनी खाली पडलेल्या देवजींना उचलून वर काढले. त्यानंतर जखमी झालेल्या देवजींवर उपचार करून त्यांना पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या प्रसंगवधनामुळे मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - रत्नागिरीत गणेश विसर्जनावेळी दोन मुले खाडीपात्रात बुडाली; शोधकार्य सुरू