रत्नागिरी - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सोमवारी रत्नागिरीत 'आम्ही भारतीय नागरिक' तर्फे महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चासाठी संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील सर्व धर्मीय नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यात मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
हेही वाचा - मुंबईत झळकलेल्या 'फ्री काश्मिर' फलकाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरींग करावे - चंद्रकांत पाटील
चंपक मैदानात जमलेल्या जनसमुदायाला नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये विविध पक्षाचे नेते सहभागी झाले होते. यावेळी सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारने देशवासियांवर लादलेल्या कायद्याचा विरोध केला. आसिफ सिद्दीकी, खासदार हुसेन दलवाई, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, मिलिंद कीर, बशीर मुर्तुझा, सामाजिक कार्यकर्ते अभिजित हेगशेट्ये, नेते आदी मंडळी सहभागी झाली होती.
हेही वाचा - तिवरे प्रकल्पग्रस्त भेट; माझ्या हातून कोणाला निलंबित करायला लावू नका- उदय सामंत
हा मोर्चा चंपक मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. या मोर्चात सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असले तरी मुस्लीम बांधवांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. या मोर्चाचे आयोजन आम्ही भारतीय नागरिक या संघटनेच्यावतीने करण्यात आले होते. मोर्चावेळी कोणालाही असुविधा निर्माण होणार नाही अथवा धर्म अथवा व्यक्तीच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थिती असूनही मोर्चा शांततेत पार पडला.
हेही वाचा - मंत्री उदय सामंत यांनी नाराज आमदार भास्कर जाधवांची घेतली भेट, चर्चांना उधाण
मोर्चेकर्यांच्या संख्येमुळे जयस्तंभ परिसर फुलून गेला होता. शेवटी मोर्चेकर्यांनी जयस्तंभाला वळसा घालून परतण्यास सुरुवात केली. यावेळी मोर्चाच्या स्वयंसेवकांनीही चांगली भूमिका बजावली. त्यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. तरीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी काही विभागातील वाहतूक थांबवून ठेवल्यामुळे काही भागात काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. मोर्चेकर्यांसाठी पाण्याच्याही सुविधा विविध संघटनांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच रस्त्यावर पडलेल्या बाटल्याही कार्यकर्त्यांनी उचलून रस्ता स्वच्छ करून दिला. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या मोर्चामध्ये युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार - उदय सामंत
दरम्यान, हुसेन दलवाई यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात हिंदू-मुस्लीम सर्वच एकत्र येऊन विरोध करत आहेत. खरंतर हे ऐक्याचे प्रतीक असून देशात सुरू असलेली हुकूमशाही लवकरच हद्दपार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपला देश लोकशाहीवर आधारित असून देशातील प्रत्येक नागरिक समान आहे . देशात धर्म, जात, वंश, वर्णाच्या आधारे भेदभाव करणे म्हणजेच भारताच्या संविधानाचे उल्लंघन आहे, असा आरोप देखील दलवाई यांनी केला. यावेळी राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली.
हेही वाचा - रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष
यावेळी आम्ही भारतीय नागरिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने देशात लागू केलेला CAA ( नागरिकत्व सुधारणा कायदा ) हा धर्मावर आधारित असल्याने असंविधानिक आहे. तसेच जागतीक मानवी हक्काच्या ( UDHR ) विरोधात आहे . त्यामुळे " आम्ही भारतीय नागरीक आमचा या कायद्याला विरोध आहे . INCR माध्यमातून सरकार पुन्हा एकदा देशातील गरीब जनतेला रांगेत उभे करून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत कागद पत्राच्या असणाऱ्या एखाद्या छोट्याश्या त्रुटीमुळे देशातील करोडो लोकांना त्रास होणार आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.