ETV Bharat / state

गेल्या पाच पिढ्यांपासून 'हे' कुटुंब साकारतंय पर्यावरणपूरक देखण्या गणेशमूर्ती - 100 वर्ष जुनी ही चित्रशाळा

काही गणेश चित्र शाळांमध्ये अगदी पिढ्यांपिढ्या गणेशमूर्ती साकारल्या जातात. संगमेश्वरमधील प्रसादे कुटुंबीयांची ही 'गणेश चित्र शाळा' 100 वर्ष जुनी चित्रशाळा आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून इथे फक्त पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासूनच मूर्ती तयार केल्या जातात.

गेल्या पाच पिढ्यांपासून 'हे' कुटुंब साकारतंय देखण्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
author img

By

Published : Aug 28, 2019, 8:43 PM IST

Updated : Aug 29, 2019, 1:59 AM IST

रत्नागिरी - अनेक वैशिष्ट्यांमुळे कोकणातल्या गणेशोत्सवाचं वेगळेपण टिकून आहे. येथील गणेशमूर्ती कारखान्यांचीही काही वैशिष्ट्ये आहेत. काही गणेश चित्र शाळांमध्ये अगदी पिढ्यांपिढ्या गणेशमूर्ती साकारल्या जातात. संगमेश्वरमधील प्रसादे कुटुंबीयांची 'गणेश चित्र शाळा' ही 100 वर्षे जुनी आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून येथे फक्त पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासूनच मूर्ती तयार केल्या जातात.

पाच पिढ्यांपासून 'हे' कुटुंब साकारतंय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

शाडूमातीपासून तयार करण्यात आलेल्या अत्यंत देखण्या आणि सूबक गणेशमूर्ती प्रसादे यांच्या गणेश चित्र शाळेत पहायला मिळतात. विठोबा प्रसादे यांनी ही गणेश चित्र शाळा सुरु केली. पहिल्यांदा काही मोजक्याच गणपती साकारून ही गणेश चित्र शाळा सुरु झाली. मात्र, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी हा गणपती साकारण्याचा डोलारा सांभाळला आहे.

विश्वास प्रसादे आणि अशोक प्रसादे ही इथे गणेश मूर्ती साकारणारी तिसरी पिढी आहेत. वयाची पासष्टी पार करूनही ते गणेश मूर्ती साकारण्यात रमतात. तर त्यांची नात स्वरा प्रसादे ही या कारखान्यात सर्वात तरुण कलाकार आहे. पाचव्या पिढीची स्वरा बायोटेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. अभ्यासातून वेळ काढून ती मूर्ती साकारण्याचा छंद जोपासते. प्रसादे कुटुंबाची पाचवी पिढी ही उच्चशिक्षित असूनही अगदी न कंटाळता या कामात रममाण झालेली पहायला मिळते.

Intro:कुटुंब रंगलंय गणेशमूर्ती कारखान्यात

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकणात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. अनेक वैशिष्ट्यांमुळे कोकणातल्या गणेशोत्सवाचं वेगळेपण टिकून आहे.. तशी इथल्या गणेशमूर्ती कारखान्यांचीही काही वैशिष्ट्ये आहेत. काही गणेश चित्र शाळांंमध्ये अगदी पिढ्यांपिढ्या गणेशमूर्ती साकारल्या जातात.. संगमेश्वरमधील प्रसादे यांची गणेश चित्र शाळा ही त्यापैकीच एक. 100 वर्ष जुनी ही चित्रशाळा आहे. पाच पिढ्यांपासून इथं फक्त पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासूनच मूर्ती तयार केल्या जातात.. प्रसादे यांची आताची पाचवी पिढी ही उच्चशिक्षित असूनही अगदी न कंटाळता या कामात रममाण झालेली पहायला मिळते.. पाहूया याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट..

Vo. 1.. अतिशय सराईतपणे गणेशमूर्तीचं काम करणारी ही आहे स्वरा राजेंद्र प्रसादे.. 20 वर्षांची स्वरा टिवाय बायोटेक्नॉलॉजीला आहे. उच्चशिक्षित असलेल्या स्वराला लहानपणापासूनच गणेशमूर्ती काढायला आवडतात.. या चित्रशाळेत काम करणारी स्वरा ही प्रसादे यांच्या पाचव्या पिढीतील.. स्वरा अगदी माती मळण्यापासून कलरकाम ते अगदी रेेेखणीपर्यंतचं काम अगदी हुशारीने करते..

Byte - स्वरा प्रसादे, (पाचवी पिढी) (चौथा byte)

Vo.2. शाडूमातीपासून तयार करण्यात आलेल्या अत्यंत देखण्या आणि सुबक गणेशमुर्ती प्रसादे यांच्या गणेश चित्र शाळेत पहायला मिळतात. पाच पिढ्यांपासून या चित्रशाळेत गणेशमुर्ती काढल्या जातात. सध्या तीन पिढ्या इथं एकत्र काम करताना पाहायला मिळत आहेत.. प्रसादे यांच्या या गणेशचित्रशाळेला १०० हून अधिक वर्ष होवून गेली आहेत. विठोबा प्रसादे यांनी हि गणेशचित्र शाळा सुरु केली. पहिल्यांदा काही मोजक्याच गणपती साकारून हि गणेशचित्र शाळा सुरु झाली. मात्र त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी हा गणपती साकारण्याचा डोलारा सांभाळला आहे. त्यापैकी एक म्हणजे अशोक प्रसादे आणि विश्वास प्रसादे. ६५ वर्ष पार करून हि लहानवयात गणपतीच्या गणेशमुर्ती साकारण्याची किमया करणारे हे दोघे आजही त्याच उत्साहाने मूर्ती साकारताना पहायला मिळतात.

बाईट-2- विश्वास प्रसादे. (तिसरी पिढी).

बाईट -3- अशोक प्रसादे (तिसरी पिढी)

(पहिला आणि दुसरा byte)

व्हिओ-3- घरातील अनेक मंडळी गणपतीची मुर्ती घडवताना इथं पहायला मिळतात. राजेंद्र प्रसादे हे तिसऱ्या पिढीतील सदस्य...गणपतीच्या मुर्तीवर आकर्षक रंगकाम करण्यात राजेंद्र यांचा हात कुणीच धरू शकत नाही. लहानवयात गणपतीच्या मुर्तीवर रंगकाम कऱण्यास सुरवात केली ती आजपर्यत..

बाईट-4- राजेंद्र प्रसादे. चौथी पिढी... (तीसरा byte)

व्हिओ-4- प्रसादे यांच्या चित्रशाळेत जवळपास सहाशे ते सातशे गणेशमुर्ती साकारल्या जातात. एक फुटापासून ते अगदी पाच फुटांपर्यत या गणेशचित्रशाळेत गणेशमुर्ती तयार केल्या जातात. शाडूच्या मातीच्या देखण्या आणि रेखीव गणेशमुर्ती प्रसादे यांच्या चित्रशाळेतून अनेक गणेशभक्त नेतात. कित्येक घरातील तीन पिढ्यांपासून प्रसादे यांच्या गणेश चित्रशाळेतून गणेशमुर्ती नेल्या जातायत.

बाईट-5- गणेश सैतवडेकर

विवेक शेरे (शेवटचे दोन बाईट)

(End p2c)

व्हिओ-5- नफ्याचा विचार न करता अगदी सेवाभावी वृत्तीने प्रसादे कुटुंबिय गेली अनेक वर्षे हे काम करत आहेत.. आपल्या कुटुंबातील कला जोपासण्यासाठी आज पाचवी पिढी सुद्धा या व्यवसायात उतरलीय. त्यामुळे पैशापेक्षा कलेच्या माध्यमातून प्रसादे कुटुंबाला आत्मिक समाधान मात्र नक्की मिळतंय.. आणि अशाच वैशिष्ट्यांमुळे कोकणातला गणेशोत्सव आपले वेगळेपण टिकवून आहे...Body:कुटुंब रंगलंय गणेशमूर्ती कारखान्यातConclusion:कुटुंब रंगलंय गणेशमूर्ती कारखान्यात
Last Updated : Aug 29, 2019, 1:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.