ETV Bharat / state

समलैंगिक संबंधातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा खून; पोलिसांनी मारेकऱ्याला ठोकल्या बेड्या

अधिकाऱ्याच्या मारेकऱ्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना तीन महिन्यांनी यश मिळाले आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Apr 12, 2019, 9:30 PM IST

रत्नागिरी - चिपळूण नगर पालिकेच्या सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मारेकऱ्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना तीन महिन्यांनी यश मिळाले आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आकाशकुमार नायर, असे बेड्या ठोकण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

चिपळूण नगरपालिकेच्या विहिरीशेजारी बावशेवाडी येथे 2 जानेवारी 2019 ला सकाळी 8.15 वाजताच्या सुमारास रामदास सावंत यांचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा तपास सध्या चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्याकडे होता. गुन्ह्याच्या तपासात मृत रामदास सावंत हे 1 जानेवारीला रात्री 9 वाजताच्या सुमारास चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकावर आले होते. तेथे काही काळ थांबून त्यांच्या दुचाकीवर एक व्यक्ती बसल्यानंतर त्याच्यासह ते निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये निष्पन्न झाले होते. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर सावंत यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. त्याचा चेहरा अस्पष्ट असल्याने पोलिसांनी त्याचे स्केच तयार केले होते.

याठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे 31 डिसेंबर 2018 चे फुटेज पाहिले असता, सावंत यांच्या दुचाकीवरून एक जानेवारीला बसून जाणाऱ्या व्यक्तीप्रमाणे चाल असणारा व पँटवर समोरील बाजूस कमरेजवळ की-चेन लावलेला संशयित दिसून आला. त्याच्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, चिपळूण पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा रत्नागिरी यांच्याकडून वेगवेगळी पथकं तयार करून शोधमोहीम सुरु केली. या पथकाला संशयित हा खेर्डी येथे राहणारा आकाशकुमार नायर असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेवून चौकशी केली असता, सावंत यांचा खून केल्याचे त्याने कबूल केले.

संशयित नायरने दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांचे संशयिताबरोबर सुमारे चार वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. सुमारे 5 ते 6 वेळा दोघांमध्ये समलैंगिक संबंध झाल्याचेही आरोपीने सांगितले. सावंत यांच्या अंगावर नेहमी सोन्याचे दागिने असल्याचे नायरने पाहिले होते. तसेच नायरने अनेकांकडून उसणवार रक्कम तसेच काही ठिकाणांहून ऑनलाईन कर्ज घेतले होते. कर्ज व रक्कम फेडण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. 1 जानेवारीला रात्री 9 वाजताच्या सुमारास सावंत आणि नायरची चिपळूण बसस्थानकावर भेट झाल्यानंतर तेथून ते समलैंगिक संबंधासाठी नगर पालिकेच्या विहिरीशेजारी बावशेवाडी येथे गेले. येथे समलैंगिक संबंध झाल्यानंतर सावंत दारूच्या नशेत असल्याने त्याचा गैरफायदा घेवून आरोपीने जवळच असलेली फरशी सावंत यांच्या डोक्यावर मारून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने घेवून तेथून पळ काढला.

पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात फरशी व सावंत यांच्या अंगावरील आरोपीने काढून घेतलेले सुमारे 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्याच्या वेळी आरोपीच्या अंगावर असलेले कपडे जप्त केले आहेत.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव हे करत आहेत.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक प्रिया ढाकणे, चिपळूणचे निरीक्षक देवेंद्र पोळ, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिरीष सासणे, उपनिरीक्षक सागर पवार, उपनिरीक्षक दाभाडे, उपनिरीक्षक कुवेस्कर, शिपाई गगनेश पटेकर, योगेश नार्वेकर, पंकज पडेलकर, मारुती जाधव, मनोज कुळे, इम्रान शेख, संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, दिनेश आखाडे, विजय आंबेकर, रमीज शेख, दत्तात्रय कांबळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Intro:सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याचा खून करणारा गजाआड

समलैंगिक संबंधातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न

रत्नागिरी, प्रतिनिधी

चिपळूण नगर पालिकेचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी यांच्या मारेकार्याच्या जेरबंद करण्यात पोलिसांना अखेर तीन महिन्यांनी यश आले आहे. मात्र
समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आकाशकुमार नायर(रा. खेर्डी, चिपळूण) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ८.१५ वा. च्या सुमारास चिपळूण नगर पालिकेच्या विहीरीशेजारी बावशेवाडी येथे रामदास सावंत यांचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा तपास सध्या चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्याकडे होता. गुन्ह्याच्या तपासात मयत रामदास सावंत हे १ जानेवारी रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक चिपळूण येथे आल्याचे व तेथे काही काळ थांबून त्यांच्या दुचाकीवर एक इसम बसल्यानंतर त्या इसमासह निघून गेल्याचे निष्पन्न झाले होते. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर सावंत यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. त्या इसमाचा चेहरा अस्पष्ट असल्याने पोलिसांनी त्याचे स्केच तयार केले होते.
दरम्यान, याठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे ३१ डिसेंबर २०१८ रोजीचे फुटेज पाहिले असता सावंत यांच्या दुचाकीवरून एक जानेवारी रोजी बसून जाणाऱ्या इसमाप्रमाणे चाल असणारा व पॅटवर समोरील बाजून कमरेजवळ की -चेन लावलेला इसम दिसून आला होता. या इसमाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, चिपळूण, चिपळूण पोलिस ठाणे, व स्थानिक गुन्हे शाखा रत्नागिरी यांच्याकडून वेगवेगळी पथके तयार करून शोध मोहिम सुरु केली. या पथकाला संशयित इसम हा खेर्डी येथे राहणारा आकाशकुमार नायर असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी त्याला गुरुवारी (ता. ११ एप्रिल २०१९) रोजी ताब्यात घेवून चौकशी केली असता सावंत यांचा खून केल्याचे त्याने कबुल केले.
संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांचे संशयिताबरोबर सुमारे चार वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. सुमारे ५ ते ६ वेळा दोघांमध्ये समलैंगिक संबंध झाल्याचेही आरोपीने सांगितले. सावंत यांच्या अंगावर नेहमी सोन्याचे दागिने असल्याचे आरोपीने पाहिले होते. तसेच आरोपी याने अनेकांकडून उसणवार रक्कम तसेच काठी ठिकाणाहून ऑनलाईन कर्ज घेतले होते. कर्ज व रक्कम फेडण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. १ जानेवारी २०१९ रोजी रात्री ९ वा.च्या सुमारास सावंत यांची आरोपी यांची चिपळूण बसस्थानकावर भेट झाल्यानंतर तेथून ते समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी नगर पालिकेच्या विहीरीशेजारी बावशेवाडी येथे गेेले. त्यावेळी समलैंगिक संबंध झाल्यानंतर सावंत हे दारुच्या नशेत असल्याने त्याचा गैरफायदा घेवून आरोपीने जवळच असलेली फरशी सावंत यांच्या डोक्यावर मारून त्यांचा खून केला. व त्यांच्या अंगावरील दागिने घेवून तेथून पळ काढला.
पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात फरशी, व सावंत यांच्या अंगावरील आरोपीने काढून घेतलेले सुमारे ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्ह्याच्या वेळी आरोपीच्या अंगावर असलेले कपडे जप्त केले आहेत.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव हे करत आहेत.
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक प्रिया ढाकणे, चिपळूणचे पो.नि. देवेंद्र पोळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिरीष सासणे, पो.ऊ.नि. सागर पवार, पो.ऊ.नि. श्री. दाभाडे, पो.ऊ.नि. श्री.कुवेस्कर, पो.कॉ. गगनेश पटेकर, योगेश नार्वेकर, पंकज पडेलकर, मारुती जाधव, मनोज कुळे, इम्रान शेख, संजय कांबळे,संदीप कोळंबेकर, दिनेश आखाडे, विजय आंबेकर, रमीज शेख, दत्तात्रय कांबळे यांनी मोलाची कामगिरी केले.

Byte - डॉ प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षकBody:सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याचा खून करणारा गजाआड

समलैंगिक संबंधातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न
Conclusion:सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याचा खून करणारा गजाआड

समलैंगिक संबंधातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.