रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेले आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंबंधित अधिक माहितीसाठी ईटीव्ही भारतचे प्रतिनीधींनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी केलेली बातचीत...
उद्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ पोलीस अधीक्षक, २ अप्पर पोलीस अधीक्षक, ८ उपपोलीस अधीक्षक, २५ पोलीस निरीक्षक, १७८ उपनिरीक्षक, ३ हजार २५० पोलीस कर्मचारी, तर १ हजार ३५० होमगार्ड, ४ राज्यराखीव पोलीस दलाच्या कंपन्या तसेच ४ केंद्रीय राखीव दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रावर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.