रत्नागिरी - रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने रत्नागिरी शहरातील माळनाका येथील धवल कॉम्प्लेक्स येथे सायबर गुन्हे आणि रस्ते वाहतूक सुरक्षा याबाबत जनजागृती करण्यात आली. रहिवाशांना मोबाईलद्वारे होणारी फसवणूक आणि आमिष याची माहिती देतानाच कोणती खबरदारी घ्यायची, कोणती माहिती द्यायची याचे मार्गदर्शन करण्यात आले.
नागरिकांसाठी मार्गदर्शनगेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत असून नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तर रस्ते वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत रस्त्यांवर वाहने चालवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजे याबाबत धवल कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांना रत्नागिरी पोलिसांनी माहिती दिली. पोलीस निरीक्षक शिरीष सासने पोलीसांचे मार्गदर्शनयावेळी या उपक्रमासाठी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी धवल कॉम्प्लेक्सचे रहिवासी विनय अंबुलकर, सदस्य अरविंद देशपांडे, सचिव सुभाष देसाई तसेच या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे युवा पत्रकार तन्मय दाते तसेच धवल कॉम्प्लेक्स येथील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हेही वाचा - पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू; शाळा-महाविद्यालये राहणार बंद