रत्नागिरी- सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बंद दुकाने फोडून लाखो रुपये लंपास करणाऱ्या मुंबईतील टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मोहम्मद खान, रिजवान खान, मुमताज शेख, एजाज सिद्दीकी, मदिना चाव, मुस्ताक खान (सर्व राहणार मुंब्रा, ठाणे), असे चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी राजापूर, सावर्डा येथे चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा- विभागात ११ महिन्यात एसटीचे २३१ अपघात, ४९ जणांचा मृत्यू; एसटीचा प्रवास सुरक्षित?