ETV Bharat / state

इंजिनिअरिंग करून शेती प्रक्रिया उद्योगाकडे वळणे आदर्शच; पंतप्रधानांनी आंबा प्रक्रिया उद्योजकाशी साधला संवाद - देवेंद्र झापडेकर रत्नागिरी

सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतलेल्या देवेंद्र झापडेकर यांनी आपल्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पुढे नेला. सरकारी योजनेंतर्गत मँगो रायपनिंग चेंबरसाठी बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरीतील मारुती मंदिर शाखेतून १६ लाख रुपयांचे कर्ज घेतले, असे झापडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएम किसान योजनेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितले.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंबा प्रक्रिया उद्योजक देवेंद्र झापडेकर यांच्याशी साधला संवाद
author img

By

Published : Aug 10, 2021, 2:25 PM IST

रत्नागिरी - पीएम किसान योजनेच्या नवव्या टप्प्याला सोमवारी प्रारंभ झाला. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यांतील शेतकर्‍यांशीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला. त्यात रत्नागिरीतील आंबा उत्पादक देवेंद्र झापडेकर यांचाही समावेश होता. इंजिनिअरिंग करून शेती प्रक्रिया उद्योगाकडे वळणे हे शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंबा प्रक्रिया उद्योजक देवेंद्र झापडेकर यांच्याशी साधला संवाद

मँगो रायपनिंग चेंबरसाठी घेतले १६ लाखांचे कर्ज -

सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतलेल्या देवेंद्र झापडेकर यांनी आपल्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पुढे नेला. सरकारी योजनेंतर्गत मँगो रायपनिंग चेंबरसाठी बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरीतील मारुती मंदिर शाखेतून १६ लाख रुपयांचे कर्ज घेतले. दोन आठवड्यांमध्ये हे कर्ज मिळाले. कर्ज घेताना बॅंकेकडून कोणताही त्रास झाला नाही, असे झापडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.

पंतप्रधानांनी जाणून घेतली माहिती -

आंबा प्रक्रिया उद्योजक झापडेकर यांना पंतप्रधान मोदी यांनी प्रश्‍न विचारत माहिती जाणून घेतली. आंबा उद्योगासाठी कुठून प्रेरणा मिळाली आणि पुढे यशस्वी कसे झाला, याची माहिती घेतली. नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्यासाठी 14 ते 15 दिवस लागायचे आता रायपनिंग चेंबरमुळे ते 4 ते 5 दिवसात पिकतात. इंजिनिअरिंगकडून थेट प्रक्रिया उद्योजक होताना घरचे नाराज होते का या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नावर झापडेकर म्हणाले, माझी आई वारंवार शेतीकडे वळण्याचा सल्ला देत होती. त्यामुळे घरातून प्रोत्साहन मिळाले. कोरोना कालावधीत आंबा पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबर फायदेशीर ठरले. कृषी विभाग, बँक ऑफ इंडियाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचे झापडेकर यांनी आवर्जून सांगितले.

शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न -

पंतप्रधान मोदी म्हणाले, शेतीमुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल झाला. या प्रकल्पामुळे तुमच्या कुटुंबाचेच नव्हे तर सहकारी शेतकर्‍यांचेही भले केले आहे. तुम्ही राबविलेल्या प्रकल्पामुळे अन्य शेतकर्‍यांपुढे आदर्श दिला आहे. असे कौतुकोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. सहा वर्षांपुर्वी गरीब शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. अनेक अडचणी येत होत्या. आता ती परिस्थिती बदलली आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चर्चेनंतर सांगतेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीकडे वळ असे सांगणाऱ्या झापडेकर तुमच्या आईला प्रणाम सांगा, असे देवेंद्र झापडेकर यांना विनम्रपणे सांगितले.

हेही वाचा - मोदींकडून 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी जमा, किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता मिळाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.