ETV Bharat / state

माणुसकीचा झरा; संचारबंदीत उपासमार होणाऱ्या मुक्या प्राण्यांना 'ते' पाजतात पाणी, देतात अन्न - उपासमार

संचारबंदीमुळे मोकाट फिरणारी गुरे, कुत्रे यांचेही हाल होत आहेत. शहरात कायमस्वरूपी मुक्कामी असलेल्या या जनावरांना संचारबंदीमुळे अन्नही मिळेनासे झालेले आहे. मात्र राजू जाधव यांनी गवत, पाव, बटर, बिस्किटे जे काही बाजारात मिळेल, ते घेऊन त्यांनी या मुक्या जनावरांची भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे.

Raj
जनावरांना पाणी पाजताना राजू जाधव
author img

By

Published : Apr 26, 2020, 6:27 PM IST

Updated : Apr 26, 2020, 8:32 PM IST

रत्नागिरी - देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीला महिना उलटून गेला आहे. संचारबंदीमुळे मोकाट फिरणारी गुरे, कुत्रे यांचेही हाल होत आहेत. शहरात कायमस्वरूपी मुक्कामी असलेल्या या जनावरांना संचारबंदीमुळे अन्नही मिळेनासे झालेले आहे. या मोकाट जनावरांच्या पोटाचा प्रश्न गंभीर झाला. मात्र राजू जाधव हे देवदूत म्हणून या जनावरांसाठी धाऊन आले असून त्यांनी या जनावरांची उपासमार थांबवली.

माणुसकीचा झरा; संचारबंदीत उपासमार होणाऱ्या मुक्या प्राण्यांना 'ते' पाजतात पाणी, देतात अन्न

संचारबंदीत माणसांना सगळीकडेच मोठ्या प्रमाणात मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या मुक्या प्राण्यांची होणारी अवहेलना लक्षात कुणी घ्यावी, असा पश्न निर्माण झाला आहे. मात्र या मुक्या प्राण्यांसाठीही काही जण पुढे आले आहेत. यातीलच एक आहेत रत्नागिरीतील राजू जाधव... माणुसकी व सामाजिक जबाबदारी समजून सामाजिक कार्य करणारे राजू जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाचे कर्मचारी आहेत. जनावरांच्या उपासमारीबाबत ते काळजी घेत आहेत.

गेले 10 दिवस काही प्रमाणात गवत, पाव, बटर, बिस्किटे जे काही बाजारात मिळेल, ते घेऊन त्यांनी या मुक्या जनावरांची भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या बाबल्या सावंत, सुधीर सावंत, दीपक कांबळे, पिंट्या सावंत या आपल्या सहकारी कर्मचारी व मित्रांच्या सहकार्याने पिण्याच्या पाण्याचा टँकर भाड्याने घेतला. रत्नागिरी बसस्थानक ते गाडीतळ, झाडगाव, काँग्रेस भुवन, आठवडा बाजार, माळनाका याठिकाणी फिरून मोकाट फिरणाऱया मुक्या जनावरांना पाणी पाजून त्यांची तहान ते भागवत आहेत. माणसासाठी मदत अनेक जण करतात. मात्र मुक्या प्राण्यांची अशी काळजी घेणारे विरळच आहेत.

Last Updated : Apr 26, 2020, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.