ETV Bharat / state

अंगारकी चतुर्थी : गणपतीपुळेमध्ये भाविकांना समुद्रात प्रवेशावर बंदी - 23 नोव्हेंबर 2021

श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

ganpatipule
ganpatipule
author img

By

Published : Nov 22, 2021, 5:39 PM IST

रत्नागिरी - कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मंगळवारी येणारी अंगारकी ही पहिलीच अंगारकी संकष्टी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोचण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. जवळपास एक ते सव्वा लाख भाविक या काळात येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी म्हटलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
बंदी नेमकी कधीश्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.नियमांचं पालन करणं बंधनकारक यावेळी भाविकांना कोरोना नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक असणार आहे. यावेळी काही भरारी पथकं देखील नेमली जाणार आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. गणपतीपुळे येथे अंगारकी निमित्त बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात व्यापारी, छोटे - मोठे स्टॉलधारक येत असतात. पण, यावेळी मात्र त्यांना मंदिर परिसरात स्टॉल लावता येणार नसून स्थानिक व्यापाऱ्यांचे दोन डोस झालेल्या असल्याल त्याला प्राधान्य दिलं जाईल. असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे. हेही वाचा - CM Thackeray Spine surgery मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.