रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय, गाडी सुटण्याच्या काही वेळापूर्वी प्रवाशांनी स्थानकात हजर राहावे, असेही कोकण रेल्वे तर्फे सांगण्यात आले आहे. दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवेशाला सुरुवात करतात. पण, यावेळी कन्फर्म तिकिट नसेल तर मात्र कुणालाही रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार नाही.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. तसेच आजपासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरू होईल. मात्र, ज्या प्रवाशांकडे आरक्षण आहे, अशाच प्रवाशांनी स्थानकात यावे. आरक्षण नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने या वर्षी मोठे नियोजन केले आहे. 225 हून अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे कोकणी गणेश भक्तांना कोकणात आणत आहे. गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासाचेही कोकण रेल्वेने मोठे नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होऊ नये यासाठी कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे नोंद घेतली जात आहे. आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाश्यांच्या गर्दीचे नियंत्रण केले जात आहे.
आता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. यावेळी केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांच्या कडे आरक्षण नाही अशा मंडळींनी स्थानकावर गर्दी करू, नये त्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही आहे. आरक्षण असलेल्या मंडळीनींही तपासणीसाठी आपल्या रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
हेही वाचा - Mumbai Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची झाली पाहिजे - देवेंद्र फडणवीस