रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील 61 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 वर पोहचली आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 161 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मृत्यू झालेला रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावचा रहिवासी होता. हा रुग्ण मुंबईहून गावी परतला होता. यानंतर 19 मे रोजी त्यांना उपचारासाठी रत्नागिरीत दाखल केले होते. मागील 8 दिवस ते कोरोनाशी झुंज देत होते. मंगळवारी सकाळी 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संगमेश्वर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 93 रुग्णांवर उपचार सुरु आहेत