ETV Bharat / state

जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; राजापूर तालुक्यातील तुळसवडे गावातील घटना - tulsavade murder case

जमिनीच्या वादातून तुळसवडे गावातील तोसकर कुटुंबात मध्यरात्री वाद झाला. यावादातून झालेल्या मारहाणीत बुधाजी तोसकर या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

one killed in a land dispute
जमिनीच्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू
author img

By

Published : Jun 22, 2020, 4:01 PM IST

रत्नागिरी - जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातल्या तुळसवडे गावी घडली आहे. विशेष म्हणजे मृत व्यक्ती होम क्वारंटाइन होती. मध्यरात्री ही घडली. बुधाजी तोसकर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

बुधाजी तोसकर हे देवगड येथे खलाशी म्हणून काम करतात. तर त्यांचे कुटुंब मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असते. दहा दिवसांपूर्वी बुधाजी आपल्या मुळगावी परतले. पण, कोरोनाच्या काळात क्वारंटाइन करण्यात आल्याने ते होम क्वारंटाइन होते. तोसकर कुटुंबियांमध्ये मागील 5 ते 6 वर्षांपासून जमिनीवरून वाद आहे. काही दिवसांपूर्वी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला होता.

दहा दिवसांपूर्वी बुधाजी हे देवगड येथून गावी आले. त्यावेळी त्यांना मालकाने दिलेले 30 हजार रूपये पुतण्या विश्वास तोसकर याने काढून घेतल्याची तक्रार त्यांनी केली होती. पाच ते सहा दिवसांपूर्वीचा हा प्रकार आहे. त्यावरून त्यांनी विश्वास तोसकर यांना विचारणा केली होती. त्यावरून देखील मोठा वाद झाला होता. यावेळी पोलीस पाटील यांनी हस्तक्षेप करत पोलीस ठाण्यात वाद मिटवावा, असे देखील सुचवले होते.

पण, मध्यरात्री पुन्हा या कुटुंबामध्ये जमिनीवरून वाद झाला. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी काठ्यांनी मारहाण झाल्यामुळे बुधाजी गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बुधाजी यांचा मुलगा, पत्नी आणि मुलगी सध्या मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्याला आहेत. दरम्यान, जमिनीवरून झालेल्या वादामुळे खून झाल्याने राजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये मंगेश तोसकर, मेघना मंगेश तोसकर, चंद्रभागा चंद्रकांत तोसकर, वैष्णवी विश्वास तोसकर आणि मीनाक्षी चंद्रकांत तोसकर यांची नावे देखील देखील समोर आली आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.