रत्नागिरी - चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता उद्या (बुधवार) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी संबंधित आदेश काढला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली. या वादळामुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी ०३ जूनला लोकांनी अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला.
10) मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान टाळण्यासाठी त्या सुरक्षित स्थळी ठेवाव्या.
11) अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
13) ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
14) सद्यस्थितीत जिल्ह्यात घरीच क्वारंटाइन असलेले नागरीक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना वेगळी व्यवस्था करावी
15) मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसिलदार कार्यालय / जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352- 226248, 222233 वर संपर्क साधावा