ETV Bharat / state

आयलॉग विरोधात पुन्हा पेटणार आंदोलन; 6 फेब्रुवारीला मोर्चा - जनहक्क

राजापूर तालुक्यातील नाटे-आंबोळगड परिसरात प्रस्तावित असणाऱ्या आयलॉगविरोधात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार आहे. त्याविरोधात 6 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

आंदोलनकर्ते
आंदोलनकर्ते
author img

By

Published : Feb 2, 2020, 1:18 PM IST

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील नाटे-आंबोळगड परिसरात प्रस्तावित असणाऱ्या आयलॉगविरोधात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार आहे. येथील मच्छीमार, बागायतदार, शेतकरी, ग्रामस्थ यांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले असून याबाबत राजापूर प्रांताधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.

माहिती देताना सत्यजित चव्हाण

आयलॉग प्रकल्पाला येथील स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. गेली 4 वर्षे हा प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिकांचा संघर्ष सुरु आहे. मात्र, अद्यापही प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जनहक्क सेवासमिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. प्रकल्प रद्द करण्यासाठी जनहक्क सेवा समितीने 6 फेब्रुवारी, 2020 रोजी राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबतचे निवेदन राजापूर प्रांतांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, जैवविविधतेने नटलेल्या माशांची खाण असलेल्या आंबोळगड किनाऱ्यावरील आयलॉग पोर्ट प्रा. लि. कंपनीचा प्रस्तावित बंदर प्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिक पंचक्रोशीची जनता संघर्ष करत आहे. 21 जानेवारी 2016 ची जनसुनावणी, 12 जानेवारी 2019 चा आंबोळगड किनाऱ्यावरील मोर्चा आणि 19 जानेवारी 2019 ची अवैध जनसुनावणी यावेळी पुर्ण विरोध जनतेने दर्शवून सुद्धा प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द झालेला नाही. मागील सरकारच्या काळात राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधान सचिव, पर्यावरण सचिव, महसूलमंत्री, कोकणविभागीय आयुक्त, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे आयुक्त, सहाय्यक मत्स्य आयुक्त रत्नागिरी इत्यादी कार्यालयांना प्रकल्प प्रस्ताव रद्द करणे व रेटून नेलेली जनसुनावणी अवैध असल्याची घोषणा करणे याबाबत निवेदन देऊन सुद्धा कार्यवाही झालेली नाही.

हेही वाचा - अर्थसंकल्पातील टॅक्स बदल अनेकांसाठी ठरणार फायदेशीर !

प्रकल्पाला पर्यावरणीय मान्यता अजूनही मिळालेली नाही, असे असताना प्रकल्पासंबंधीत काही कामे सुरु झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही बेकायदेशीर कामे अजुनही बंद करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर नवीन सरकारसमोर बहुसंख्य जनतेच्या साक्षीने प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 6 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 11 वाजता राजापूर तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात 1500 लोकांचा सहभाग असण्याची शक्यता निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
हेही वाचा - खेडमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप, जिल्हाधिकार्‍यांनी साधला संपर्क

Intro:आयलॉग विरोधातील आंदोलन पुन्हा पेटणार;

६ फेब्रुवारीला राजापूर तहसिलवर मोर्चा

रत्नागिरी/प्रतिनिधी :

राजापूर तालुक्यातील नाटे -आंबोळगड परिसरात प्रस्तावित असणाऱ्या आयलॉगविरोधात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार आहे. येथील मच्छीमार बागायतदार, शेतकरी, ग्रामस्थ यांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले असून याबाबत राजापूर प्रांताधिकारी यांना निवेदनही देण्यात आलं आहे.
आयलॉग प्रकल्पाला येथील स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. गेली ४ वर्षे हा प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिकांचा संघर्ष सुरु आहे. मात्र अद्यापही प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जनहक्क सेवासमिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. प्रकल्प रद्द करण्यासाठी जनहक्क सेवा समितीने ६ फेब्रुवारी २०२० रोजी राजापूर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे.त्याबाबतचे निवेदन राजापूर प्रांतांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जैवविविधतेने नटलेल्या माशांची खाण असलेल्या आंबोळगड किनाऱ्यावरील आयलॉग पोर्ट प्रा. लि. कंपनीचा प्रस्तावित बंदर प्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिक पंचक्रोशीची जनता संघर्ष करत आहे. २१ जानेवारी २०१६ ची जनसुनावणी, १२ जानेवारी २०१९ चा आंबोळगड किनाऱ्यावरील मोर्चा आणि १९ जानेवारी २०१९ ची अवैध जनसुनावणी यावेळी पुर्ण विरोध जनतेने दर्शवून सुद्धा प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द झालेला नाही. मागील सरकारच्या काळात राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधान सचिव, पर्यावरण सचिव, महसूलमंत्री, कोकणविभागीय आयुक्त, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे आयुक्त, सहाय्यक मत्स्य आयुक्त रत्नागिरी इत्यादी कार्यालयांना प्रकल्प प्रस्ताव रद्द करणे व रेटून नेलेली जनसुनावणी अवैध असल्याची घोषणा करणे याबाबत निवेदन देऊन सुद्धा कार्यवाही झालेली नाही.
प्रकल्पाला पर्यावरणीय मान्यता अजूनही मिळालेली नाही. असे असताना प्रकल्पासंबंधीत काही कामे सुरु झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही बेकायदेशीर कामे अजुनही बंद करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर नवीन सरकारसमोर बहुसंख्य जनतेच्या साक्षीने प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.त्यासाठी ६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वा. राजापूर तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात १५०० लोकांचा सहभाग असण्याची शक्यता निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

Byte - सत्यजित चव्हाण, अध्यक्ष, जनहक्क सेवा समिती
Body:आयलॉग विरोधातील आंदोलन पुन्हा पेटणार;

६ फेब्रुवारीला राजापूर तहसिलवर मोर्चाConclusion:आयलॉग विरोधातील आंदोलन पुन्हा पेटणार;

६ फेब्रुवारीला राजापूर तहसिलवर मोर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.