ETV Bharat / state

रत्नागिरीत संततधार; मच्छिमारांना सावधानतेचा इशारा - रत्नागिरीत पावसाची संततधार

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी व रत्नागिरीच्या किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहणार आहे.

रत्नागिरीत पावसाची संततधार
author img

By

Published : Oct 25, 2019, 1:09 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली नाही. पावसाच्या या खेळामुळे शेतकरी मात्र, संकटात सापडला आहे.

रत्नागिरीत पावसाची संततधार

यावर्षी नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस सुरूच आहे. शेतातील भातपीक पूर्ण तयार झाल्याने शेतकरी पीक कापणीच्या तयारीत आहे. अनेक ठिकाणी शेतात कापून ठेवलेले भातपीक शेतातच भिजले आहे. हे पीक पुन्हा शेतातच रुजण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. हातातोंडाशी आलेला घास हीरावल्या जाण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत आहे.

हेही वाचा - श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी

मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी व रत्नागिरीच्या किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मासेमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे पर्यटक आणि नागरिकांसाठी बंद ठेवण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

Intro:जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप

कोकण किनाऱ्यावर वादळी पावसाची शक्यता

मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. गेले काही दिवस पावसाचा हा लपंडाव सुरू आहे. पावसाच्या या खेळामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.
नोव्हेंबर महिना उजाडायला आला तरी पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीय. गेले आठ-दहा दिवस तर पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. शेतातलं भातपीक पूर्ण तयार झाल्याने शेतकरी कापणीला देखील लागला, मात्र पावसाने खो घातला. अनेक ठिकाणी शेतात कापून ठेवलेलं भातपिक शेतातच भिजलं आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने हे पीक पुन्हा शेतातच रुजतं की काय अशी भीती शेतकऱ्याला वाटत आहे. त्यात उभं असलेलं पीकही या पावसामुळे जमिनीला टेकायला आलं आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाणार की काय भितीने शेतकरी चिंतेत आहे.
दरम्यान गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शुक्रवारीही सकाळपासूनच हजेरी लावली आहे.

मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी व रत्नागिरी किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मासेमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे पर्यटक तसेच नागरिकासाठी बंद ठेवण्यात यावेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Body:जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप

कोकण किनाऱ्यावर वादळी पावसाची शक्यता

मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
Conclusion:जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप

कोकण किनाऱ्यावर वादळी पावसाची शक्यता

मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.