चिपळूण (रत्नागिरी) - केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला विविध राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, चिपळूण शहर व तालुक्यातील गावांमध्ये सकाळपासून सर्व सुरळीत सुरू आहे. यामुळे चिपळूण तालुक्यात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
सर्व वाहतूक सुरळीत
शहरातील रिक्षा व एसटी बस वाहतूक, भाजी मंडई त्याचबरोबर सर्व दुकाने चालू असलेले पाहायला मिळाले. मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू असल्याने भारत बंद तालुक्यात अयशस्वी ठरला आहे.
हेही वाचा - शेतकरी आंदोलनावरुन तावडेंनी नाव न घेता शिवसेनेला फटकारले
हेही वाचा - 'शिवसेना-राष्ट्रवादी सारख्या विरोधकांना "हा" विषय चिघळवायचा आहे'