रत्नागिरी - सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. हा एकप्रकारे दिलासाच दिला आहे. दहा दिवसांचे रिलीफ आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही ट्रायल कोर्टात जा, ट्रायल कोर्टात आम्ही जाऊ, याचा अर्थ जामीन अर्ज फेटाळला असा होत नाही, अशी प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिली. नितेश राणे यांना आजच्या आज हजर राहायला सांगितलं असतं, तर अर्ज फेटाळला असा अर्थ होतो, असेही निलेश राणे म्हणाले. ते आज गुहागरमध्ये बोलत होते.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक नितेश राणे (Nitesh Rane) यांना चांगलीच भोवली आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणी 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या प्रकरणामध्ये नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या संदर्भात आज सुनावणी पार पडली असून, नितेश राणे यांना जिल्हा कोर्टासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुदत दिली आहे.