रत्नागिरी- पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण नसणार आहे. राज्याचे अपिल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. पण आरक्षण न्यायालयात का टिकले नाही यासंदर्भात नारायण राणेंशी बोलून त्याची कारणे शोधावी लागतील, असे मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे. ते आज रत्नागिरी येथे बोलत होते.
तसेच जेव्हा जेव्हा समाज हाक देईल तेव्हा समाज बांधव रस्त्यावर उतरतील. पण आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असेही निलेश राणे म्हणाले.