ETV Bharat / state

नारायण राणेंवर टीका करण्याइतकी भास्कर जाधवांची लायकी नाही- निलेश राणे

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

माजी खासदार निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे
author img

By

Published : Jan 19, 2021, 3:13 PM IST

रत्नागिरी - स्वतःच्या गावात आधी तुमचं अस्तित्व निर्माण करा आणि मग राणेंच्या अस्तित्वावर भाष्य करा, अजूनपर्यंत अहो-जाओ करतोय. मला भाषा सोडायला भाग पाडू नका, असा इशारा देत भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतला आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

निलेश राणे
तर भास्कर जाधव यांना जशास तसं उत्तर मिळेल-
यावेळी निलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांनी जी भाषा वापरली. त्यापेक्षा वाईट भाषा मी वापरू शकतो. कोकणात आमचं अस्तित्व किती राहिलंय? यापेक्षा तुमच्या गावात तुमचं अस्तित्व आहे का? याचा तपास भास्कर जाधव यांनी करावा, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान गावातील मंदिरात भास्कर जाधव यांना मीटिंगला बोलावलं नाही म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. अशा भास्कर जाधव यांची नारायण राणेंवर टीका करण्याइतकी लायकी नाही. यापुढे जर नारायण राणेंवर उलटीसुलटी भाषा वापरली. तर भास्कर जाधव यांना जशास तसं उत्तर मिळेल, असा इशारा निलेश राणे यांनी यावेळी दिला.

राणेंचं अस्तिव काय आहे हे सिंधुदुर्गने दाखवलं-

राणेंचं अस्तिव काय आहे हे सिंधुदुर्गने दाखवलं आहे. रत्नागिरीतही दिसलेलं आहे. म्हणून भास्कर जाधव यांनी स्वतःची लायकी ओळखली पाहिजे. मर्यादा सोडली तर आम्ही सुद्धा काहीही बोलू शकतो. स्वतःच्या गावात तुमचं अस्तित्व निर्माण करा आणि मग राणेंच्या अस्तित्वावर भाष्य करा. अजूनपर्यंत अहो-जाओ करतोय भाषा सोडायला भाग पाडू नका, असा इशारा निलेश राणे यांनी यावेळी दिला.

हेही वाचा- कोरोना लस घेतल्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

हेही वाचा- कृषी आंदोलन : शेतकऱ्यांसोबत चर्चेची दहावी फेरी सरकारने पुढे ढकलली

रत्नागिरी - स्वतःच्या गावात आधी तुमचं अस्तित्व निर्माण करा आणि मग राणेंच्या अस्तित्वावर भाष्य करा, अजूनपर्यंत अहो-जाओ करतोय. मला भाषा सोडायला भाग पाडू नका, असा इशारा देत भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतला आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

निलेश राणे
तर भास्कर जाधव यांना जशास तसं उत्तर मिळेल-यावेळी निलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांनी जी भाषा वापरली. त्यापेक्षा वाईट भाषा मी वापरू शकतो. कोकणात आमचं अस्तित्व किती राहिलंय? यापेक्षा तुमच्या गावात तुमचं अस्तित्व आहे का? याचा तपास भास्कर जाधव यांनी करावा, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान गावातील मंदिरात भास्कर जाधव यांना मीटिंगला बोलावलं नाही म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. अशा भास्कर जाधव यांची नारायण राणेंवर टीका करण्याइतकी लायकी नाही. यापुढे जर नारायण राणेंवर उलटीसुलटी भाषा वापरली. तर भास्कर जाधव यांना जशास तसं उत्तर मिळेल, असा इशारा निलेश राणे यांनी यावेळी दिला.

राणेंचं अस्तिव काय आहे हे सिंधुदुर्गने दाखवलं-

राणेंचं अस्तिव काय आहे हे सिंधुदुर्गने दाखवलं आहे. रत्नागिरीतही दिसलेलं आहे. म्हणून भास्कर जाधव यांनी स्वतःची लायकी ओळखली पाहिजे. मर्यादा सोडली तर आम्ही सुद्धा काहीही बोलू शकतो. स्वतःच्या गावात तुमचं अस्तित्व निर्माण करा आणि मग राणेंच्या अस्तित्वावर भाष्य करा. अजूनपर्यंत अहो-जाओ करतोय भाषा सोडायला भाग पाडू नका, असा इशारा निलेश राणे यांनी यावेळी दिला.

हेही वाचा- कोरोना लस घेतल्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

हेही वाचा- कृषी आंदोलन : शेतकऱ्यांसोबत चर्चेची दहावी फेरी सरकारने पुढे ढकलली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.