रत्नागिरी - जास्त मस्ती करू नका, नाहीतर ठाकरे आणि सोनू निगम यांचे जे किस्से आहेत ते सर्व एक दिवसात उघडून टाकीन, तोंड लपवायला जागा मिळणार नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, असा इशारा भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.
राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष
सध्या सचिन वाझे प्रकरणावरून राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. रविवारी भाजपा आमदार नीतेश राणे यांनी युवासेना सरचिटणीस यांच्यावर सचिन वाझे प्रकरणावरून आरोप केले होते, त्यावर वरूण सरदेसाई यांनीही नीतेश राणे यांच्यावरून अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले होते. यावरूनच नीलेश राणे यांनीही शिवसेनेला इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किंवा सोनू निगमला विचारा. तसेच ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी ज्यास्त नाटक केले तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार, असे दोन ट्विट नीलेश राणे यांनी केले होते.
'स्वतःची अब्रू असावी लागते'
नीलेश म्हणाले, की अब्रू नुकसानीचा दावा करण्यासाठी मुळात स्वतःची अब्रू असावी लागते. वरुण सरदेसाई आणि त्यांची चौकट मुंबईच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये दर रात्री स्वतःचीच अब्रू काढत असतात. जास्त मस्ती करू नका. नाहीतर तोंड लपवायला जागा मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.