ETV Bharat / state

दीपक केसरकर 2024 नंतर जिल्ह्याच्या राजकारणामधूनही गायब होतील - निलेश राणे - निलेश राणे

माजी खासदार निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंवरील भाष्यामुळे निलेश राणेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

nilesh rane criticize deepak kesarkar in ratnagiri
दिपक केसरकर 2024 नंतर जिल्ह्याच्या राजकारणामधूनही गायब होतील - नीलेश राणे
author img

By

Published : Nov 3, 2020, 5:28 PM IST

रत्नागिरी - दीपक केसरकर आता कोरोनाच्या काळात जसे स्वतःच्या मतदारसंघातून गायब होते, तसे जिल्ह्याच्या राजकारणामधूनही 2024 नंतर गायब होतील, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

निलेश राणे यांची प्रतिक्रिया
दीपक केसरकर यांना आता शिवसेनेतच कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांची अवस्था शिवसेनेमध्ये काय झाली आहे, हे मागच्या निवडणुकीपासून लोकांनी बघितले आहे. सावंतवाडीमध्येही त्यांना कोणी किंमत देत नाही. केसरकर हे कोरोना काळात मतदारांना वाऱ्यावर सोडून मुंबईत बसले होते. एक साधा मास्क किंवा सॅनिटायझरची बाटलीही त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात दिली नाही, अशा माणसाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणेंवर टीका करायचा अधिकार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले.
नारायण राणेंचे नाव घेऊन हे मोठे झाले-
दीपक केसरकर हे नारायण राणेंचे नाव घेऊन मोठे झाले. पुढे मंत्रीही झाले. आज महाराष्ट्रात वेगळी ओळख त्यांना नारायण राणेंमुळे मिळाली; म्हणून त्या माणसाला आम्ही गांभीर्याने कधी घेतलेले नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. दीपक केसरकर आता कोरोनाच्या काळात जसे स्वतःच्या मतदारसंघातून गायब होते, तसे जिल्ह्याच्या राजकारणामधूनही 2024 नंतर गायब होतील, असा दावाही नीलेश राणे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.