रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 600 च्या उंबऱ्यावर पोहोचली आहे. काल (मंगळवार) रात्रीपासून आणखी 19 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 599 वर पोहोचला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात आणखी 19 जणांची भर पडली आहे. विशेष म्हणजे या 19 पैकी 16 रुग्ण हे एकट्या दापोली तालुक्यातील आहेत. तर, 3 रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. दापोली तालुक्यातील 19 पैकी आडे गावात 10 रुग्ण सापडले आहेत. तर, जालगाव, हर्णे, बुरोंडी, टेटवली मोहल्ला, मुगीज, फॅमिली माळ या भागात प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे, तिवंडेवाडी शिरगाव तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या 599 एवढी झाली आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण 437 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण 138 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये पुन्हा दाखल झालेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.