ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या फोटोची आरती करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे चिपळूणमध्ये अनोखे आंदोलन

वाढत्या महागाईने सध्या सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. सामान्य नागरिक व महिला भगिनीचे यामुळे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे भाऊबीजेच्या एक दिवस अगोदर चिपळूणमध्ये राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.

agitation
राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : Nov 5, 2021, 4:34 PM IST

Updated : Nov 5, 2021, 6:50 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात चिपळूणमध्ये आज अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी गॅस सिलेंडरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची आरती करत, चुलीवर भाकरी भाजत आणि भाजप पदाधिकाऱ्यांना निवेदन देत हे आंदोलन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्या व राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणमध्ये हे आंदोलन करण्यात आलं.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

हेही वाचा - कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अजित पवार पाडवा कार्यक्रमाला अनुपस्थितीत; शरद पवारांनी दिले उत्तर

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन -

वाढत्या महागाईने सध्या सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. सामान्य नागरिक व महिला भगिनीचे यामुळे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे भाऊबीजेच्या एक दिवस अगोदर चिपळूणमध्ये राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर चूल पेटवून भाकरी बनविण्यात आली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या प्रतिमेसमोर आरती करून भाऊबीजची ओवळणी म्हणून दरवाढीत 50 टक्के सवलत मिळावी अशी मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी महिला कॉग्रेस यांच्यावतीने भाजप कार्यालयात जाऊन तेथील पदाधिकारी यांना दरवाढ कमी करण्याबाबत निवेदन सादर करत आगळवेगळं आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेही वाचा - फटाके घेण्यासाठी ठाणेकरांची मोठी गर्दी; इंधन दरवाढीमुळे वाढल्या आहेत किंमती

Last Updated : Nov 5, 2021, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.