ETV Bharat / state

शरद पवारांनी घेतली तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांची भेट; आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन

पवार यांनी तिवरे धरणाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा देखील केली. तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांशी चर्चा करताना शरद पवार
author img

By

Published : Jul 8, 2019, 4:44 PM IST

Updated : Jul 8, 2019, 7:56 PM IST

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटना भीषण होती. याबाबत केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच लवकरात लवकर चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. आज त्यांनी तिवरे धरण दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांनी घेतली तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांची भेट

काय आहे तिवरे धरण दुर्घटना? वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

पवार यांनी तिवरे धरणाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा देखील केली. तसेच राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेची भीषणता केंद्र सरकारला देणार असल्याचे पवार म्हणाले. यावेळी आमदार भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शेखर निकम, पंचायत समिती सभापती पूजा निकम आदी उपस्थित होते.

Intro:शरद पवार यांनी दिली तिवरे धरण दुर्घटनास्थळी भेट
मृतांच्या नातेवाईकांची केली विचारपूस

राज्यसरकारच्या त्या यंत्रणेला उचित अशी चौकशी करायला सांगून, योग्य ती कारवाई कारण्याबाबत आग्रह धरू - शरद पवार

रत्नागिरी, प्रतिनिधी

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे पवार यांनी सांत्वन केलं आणि त्यांच्या व्यथा पवार यांनी यावेळी जाणून घेतल्या.. या दुर्घटनेप्रकरणी जास्तीत जास्त आर्थिक मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून कशी मिळेल यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू, तसेच धरणाच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार होऊनही दुर्लक्ष करण्यात आलं याबाबत राज्यसरकारच्या त्या यंत्रणेला उचित अशी चौकशी करायला सांगू आणि योग्य ती कारवाई कारण्याबाबत आग्रह धरू असं पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांना आश्वासित केलं.. यावेळी आमदार भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शेखर निकम, पंचायत समिती सभापती पूजा निकम, चिपळूणचे प्रांत, तहसीलदार आदी उपस्थित होते..

2 जुलै रोजी झालेल्या तिवरे धरण दुर्घटनेत एकूण 22 जण बेपत्ता झाले होते. पैकी 19 जणांचे मृतदेह सापडले होते. अजून 3 जण बेपत्ता आहेत. त्यांचं शोधकार्य अद्यापही सुरूच आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केलं...तसेच तिवरे धरण फुटले कसे याची पहाणी करून येथील ग्रामस्थांशी चर्चा देखील केली.. त्याचबरोबर राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या 9नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देखील करण्यात आली. तिवरे येथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार करू आणि ही दुर्घटना किती भीषण होती याची माहिती केंद्र सरकारला देणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं..

Byte -शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसBody:शरद पवार यांनी दिली तिवरे धरण दुर्घटनास्थळी भेट
मृतांच्या नातेवाईकांची केली विचारपूस

राज्यसरकारच्या त्या यंत्रणेला उचित अशी चौकशी करायला सांगून, योग्य ती कारवाई कारण्याबाबत आग्रह धरू - शरद पवारConclusion:शरद पवार यांनी दिली तिवरे धरण दुर्घटनास्थळी भेट
मृतांच्या नातेवाईकांची केली विचारपूस

राज्यसरकारच्या त्या यंत्रणेला उचित अशी चौकशी करायला सांगून, योग्य ती कारवाई कारण्याबाबत आग्रह धरू - शरद पवार
Last Updated : Jul 8, 2019, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.