ETV Bharat / state

रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे निधन

२००६ च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी नगराध्यक्ष पदाची संधी हुकल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. २०११ च्या नगरपरिषद निवडणूकीत शिवसेनेतून ते पुन्हा एकदा नगरसेवक झाले. दोन वेळा शिवसेनेकडून कोकण स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषद निवडणूक लढवली.

नगराध्यक्ष उमेश शेट्ये
author img

By

Published : Apr 22, 2019, 12:26 PM IST

रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. कार्यसम्राट नगराध्यक्ष म्हणून ख्याती असलेले उमेश शेट्ये यांच्या अचानक निधनाने रत्नागिरीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

१९९१ ला रत्नागिरी नगरपरिषदेत ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९३ ला नियोजन सभापती, १९९४ ला आरोग्यसभापती, १९९५ ला पाणीपुरवठा सभापती अशी सलग पदे त्यांनी भूषवली. त्यानंतर डिसेंबर १९९६ मध्ये ते रत्नागिरीचे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. २००१ मध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत उमेश शेट्ये दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले.

२००६ च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी नगराध्यक्ष पदाची संधी हुकल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. २०११ च्या नगरपरिषद निवडणूकीत शिवसेनेतून ते पुन्हा एकदा नगरसेवक झाले. दोन वेळा शिवसेनेकडून कोकण स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषद निवडणूक लढवली. २०१४ मध्ये शिवसेनेचा राजीनामा देऊन उमेश शेट्ये यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.

उमेश शेट्ये यांच्या कारकिर्दीत रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह, जलतरण तलाव, उद्याने अशी कामे त्यांनी केली. नगरपरिषदेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आणि अभ्यास त्यांचा होता.

Intro:माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचं निधन

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचं शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. कार्यसम्राट नगराध्यक्ष म्हणून ख्याती असलेले उमेश शेट्ये यांच्या अचानक निधनाने रत्नागिरीत शोककळा पसरली आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 55 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
उमेश शेट्ये हे रत्नागिरीतील हरहुन्नरी नेतृत्व होते. 1991 ला रत्नागिरी नगरपरिषदेत ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. 1993 नियोजन सभापती, 1994 ला आरोग्यसभापती, 1995 ला पाणीपुरवठा सभापती हि पदे त्यांनी भूषवली.
त्यानंतर डिसेंबर 1996 मध्ये ते रत्नागिरीचे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. 2001 मध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत उमेश शेट्ये दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले. 2006 च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी नगराध्यक्ष पदाची संधी हुकल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2011 च्या नगरपरिषद निवडणूकीत शिवसेनेतून ते पुन्हा एकदा नगरसेवक झाले. दोन वेळा शिवसेनेकडून कोंकण स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषद निवडणूक लढवली. 2014 मध्ये शिवसेनेचा राजीनामा देऊन उमेश शेट्ये यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.
उमेश शेट्ये यांच्या कारकिर्दीत रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली.उमेश शेट्ये यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत रत्नागिरी शहरात अनेक विकास कामे झाली. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह, जलतरण तलाव, उद्याने अशी कामे त्यांनी केली. नगरपरिषदेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आणि अभ्यास त्यांचा होता.. त्यांच्या जाण्याने रत्नागिरीच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे..

Body:माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचं निधन
Conclusion:माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचं निधन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.