रत्नागिरी - लोकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आपण शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचल्याने आपला विजय निश्चित आहे, असे मत काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार बांदिवडेकरांनी आज लोकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आपण शेवटच्या मतदारापर्यंत पोहचलेलो आहे, असे वक्तव्य केले. तसेच यामुळेच माझा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुती, स्वाभिमान तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या जाहीर सभा झाल्या. मात्र आघाडीची एकही जाहीर सभा झालेली नाही. या ठिकाणी आघाडीचे उमेदवार बांदिवडेकर लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वेंगुर्ले शहरात मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार केला. यावेळी आपणच शेवटच्या मतदारापर्यंत पोहचल्याचा दावा त्यांनी केला.
तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे मतदान होत आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुती, स्वाभिमान आणि आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. मात्र, खरी लढतही शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यात आहे. याठिकाणी आघाडीची एकही जाहीर सभा झालेली नाही. मात्र, त्यांनी वैयक्तिक गाठीभेटीच्या प्रचारावर भर दिलेला दिसला.
बांदिवडेकरांची उमेदवारी आणि गोंधळ
नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी संबंध आहे, असा आरोप बांदिवडेकर यांच्यावर झाला होता. यानंतर त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सोशल मीडियावरही यावरुन धुमाकूळ माजला होता.