ETV Bharat / state

राजापूरमधील रिफायनरी समर्थक शिवसैनिकांचा भाजपामध्ये प्रवेश

author img

By

Published : Jul 4, 2021, 5:34 PM IST

जवळपास 70 कार्यकर्ते यांनी शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तारळ, अनसुरे, मिठगावणे या गावातील हे कार्यकर्ते आहेत. प्रवेश केलेले कार्यकर्ते हे सेना आमदार राजन साळवी यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक होते.

Rajapur Shiv sena
Rajapur Shiv sena

रत्नागिरी - रिफायनरीवरून राजापूरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. त्यात आज शिवसेनेतील रिफायनरी समर्थकांनी शिवसेनेला झटका दिला आहे. रिफायनरी समर्थक शिवसेना कार्यकर्त्यांनी आज कोकणातील भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जवळपास 70 कार्यकर्ते यांनी शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तारळ, अनसुरे, मिठगावणे या गावातील हे कार्यकर्ते आहेत. प्रवेश केलेले कार्यकर्ते हे सेना आमदार राजन साळवी यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक होते. राजापूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव आदी उपस्थित होते.

नाणारचे समर्थन केले म्हणून हकालपट्टी

गेली चार वर्ष राजापूर तालुक्यातील प्रास्तावित रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात असली तरी या भागातील अनेक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. काहींनी तर उघड समर्थन केले म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यामध्ये सागवे विभागप्रमुख राजा काजवे, जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांसारख्यांचा समावेश होता. राजापूर तालुक्यात रिफायनरी झाली पाहिजे, असे या कार्यकर्त्यांचे मत आहे. पण शिवसेनेची नवीन जागेबाबत भूमिका अद्याप देखील स्पष्ट नाही. त्यामुळे राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर यांसारख्या जवळपास 70 ते 80 पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला कोकणात धक्का बसला आहे.

'रिफायनरी आली तर विकास होईल'

आम्ही शिवसेना वाढवली पण आमचे म्हणणे आमचे वरिष्ठ जाणून घेण्याऐवजी कारवाई करत असतील तर त्याचा उपयोग काय, आज तरुणवर्ग रोजगारासाठी मुंबई-पुण्यात जातो, इथला विकास खुंटला आहे, रिफायनरी आली तर विकास होईल, या मुद्द्यांवर आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे काजवे आणि इतर कार्यकर्त्यांनी सांगितले.

शिवसेनेची भूमिका काय?

उद्या अधिवेशन असून त्याचा अगोदर कोकणात रिफायनरीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व परिस्थिती पाहता आता शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.