रत्नागिरी - येथील मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. तब्बल 15 तासानंतर जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शुक्रवारी रात्री 8 वाजता जगबुडी पुलावरील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती.
आज जगबुडी नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सकाळी 11:15 वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.