ETV Bharat / state

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला; सुदैवानं जीवितहानी नाही - सुदैवानं जीवितहानी नाही

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

Mumbai Goa Highway
मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 10:46 AM IST

Updated : Oct 16, 2023, 2:02 PM IST

रत्नागिरी Mumbai Goa Highway : मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील नवीन उड्डाणपुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी चिपळूण या पुलावरील नवीन टाकलेला गर्डर अचानक कोसळला. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान एक मोठा आवाज झाला अन् उड्डाणपुलाच्या मधोमध असलेला एक गर्डर क्रॅक जाऊन तुटला, त्याचे काही अवशेषदेखील खाली पडले. मात्र त्यावेळी उड्डाणपुलाच्या जवळ कोणीही नागरिक किंवा कोणतेही वाहन नसल्यानं कोणतीही दुर्घटना घडली नाही. दरम्यान, या पूल दुर्घटनेप्रकरणी पुलाच्या सेफ्टी इंजिनिअरला धक्काबुक्की झाली आहे. तसंच घटना घडल्यानंतर घटनास्थळी कोणीही हजर नव्हतं. त्यामुळे सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत.

सर्वसामान्यांमध्ये नाराजी : दरम्यान, नवीन कामाची जर ही अवस्था असेल तर या उड्डाणपुलाचे भवितव्य काय?, असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांमधून विचारला जातोय. ज्या वेळेला या गडरचा काही भाग कोसळला त्यावेळेला त्या ठिकाणी कोणताही सेफ्टी इंजिनियर अथवा कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींमधून नाराजी यांनी संतापही व्यक्त केला जात आहे.

सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची घटनास्थळी धाव : पुलाचा गर्डर कोसळल्याची सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पुलाजवळ एकही अधिकारी आलेला नव्हता. त्यानंतर सेफ्टी इंजिनीअर या ठिकाणी आल्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला शिवीगाळ करत घटनेचा जाब विचारला. तसंच यावेळी त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. त्यामुळं या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या उड्डाणपूलाचं काम निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून या कामाच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.

यापूर्वीही घडली होती अशीच दुर्घटना : दोन महिन्यांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला होता. मात्र, सुदैवानं तेव्हाही कोणतीही हानी झाली नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.

हेही वाचा -

  1. Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं; मनसेचा आरोप
  2. MNS Jagar Yatra: अमित ठाकरे यांच्या जागर यात्रेला सुरुवात; 'मनसे'चे हे आंदोलन शांततेत, मात्र यापुढे...
  3. Amit Thackerays Padyatra : मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून अमित ठाकरेंची पदयात्रा सुरू, मनसेचे अनेक कार्यकर्ते सहभागी

Last Updated : Oct 16, 2023, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.