ETV Bharat / state

'निसर्ग'मुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 40 हजारांहून अधिक घरांची पडझड - घरांची पडझड

निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरीच्या दापोली आणि मंडणगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. या दोन तालुक्यात बाधित झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांची संख्या 26 हजार 354 इतकी आहे. यातील 21 हजार 695 घरांचे पंचनामे शुक्रवारी (दि. 12 जून) सायंकाळपर्यंत पूर्ण झाले.

collapsed houses
पडझड झालेली घरे
author img

By

Published : Jun 13, 2020, 12:45 PM IST

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरीच्या दापोली आणि मंडणगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. या दोन तालुक्यात बाधित झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांची संख्या 26 हजार 354 इतकी आहे. यातील 21 हजार 695 घरांचे पंचनामे शुक्रवारी (दि. 12 जून) सायंकाळपर्यंत पूर्ण झाले. उर्वरित पंचनामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अधिक गती वाढवलेली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची संख्या 40 हजार 436 इतकी आहे.

पडझड झालेली घरे

3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले होते. यावेळी कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. यात अनेक घरांची पडझड झाली. अनेकांचे आंबा, नारळ, सुपारीची झाडे उद्ध्वस्त झाली होती. यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पूर्णत: नष्ट किंवा मोठ्या प्रमाणावर पडझड झालेल्या घरांची संख्या 1 हजार 500 आहे. यातील 1 हजार 230 घरांचे पंचनामे पूर्ण झाले.

दापोली तालुक्यात दापोलीत अंशत: पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या 2 हजार 212 असून यापैकी 389 पंचनामे पूर्ण झाले. तर कच्च्या घरांची संख्या 9 हजार 22 असून त्यापैकी 5 हजार 112 पंचनामे पूर्ण झाले आहेत.

अंशत: पडझड झालेल्या घरांची मंडणगड तालुक्यातील पक्क्या घरांची संख्या 12 हजार असून यातील 8 हजार 560 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर कच्च्या घरांची संख्या शून्य आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या कच्ची घरे, पक्की घरे व झोपड्यांची संख्या 40 हजार 436 आहे. त्यापैकी 26 हजार 365 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्याला 75 कोटींची तत्काळ मदत जाहीर केली आहे. तसेच खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत आढळले कोरोनाचे दोन नवे रुग्ण, पंधरा जणांना डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.